नवी दिल्ली:- देशाची राजधानी दिल्लीमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. बलात्काराचा आरोप मागे न घेतल्यामुळे येथील आरोपीने पीडितेच्या मुलीवर अॅसिड फेकले. त्यानंतर अॅसिड पिऊन आत्महत्या केली आहे. दिल्लीतील आनंद पर्वत या परिसरातील ही धक्कादायक घटना आहे. आरोपीने याआधी त्या मुलीच्या आईवर बलात्कार केला होता. याच प्रकरणात त्याला तुरुंगात ठेवण्यात आले होते. याचदरम्यान आरोपीला त्याच्या घरी लग्न कार्य असल्यामुळे न्यायालयातून जामिन मिळाला होता.
त्या सुट्टीचा गैरफायदा घेऊन आरोपीने हे कृत्य केले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, 7 डिसेंबरला आरोपीने अल्पवयीन मुलीवर अॅसिड फेकल्याची माहिती आनंद पर्वत येथील स्थानिक पोलीसांना मिळाली. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असता, मुलगी आणि आरोपी दोघांनाही रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात पोहोचल्यावर पोलीसांना या संपूर्ण घटनेची माहिती मिळाली. यादरम्यान उपचार सुरु असताना आरोपीचा मृत्यू झाला. तर पीडितेवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
हे पण वाचा
- वैद्यकीय सेवेसाठी कायम सहकार्य:-पालकमंत्री गुलाबराव पाटील; पालकमंत्र्यांचा डॉक्टर असोसिएशन मार्फत सत्कार
- अमळनेर येथे एमपीडीएतून सूटलेल्या,गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यावर अज्ञात व्यक्तिंनी लाठ्या काठ्यांनी केला जीवघेणा हल्ला.
- भडगांव महसुल विभागाची धडक कारवाई; अवैध वाळू चोरी करून वाहतुक करतांना २ डंपर जप्त
- आजचे राशी भविष्य बुधवार दि.५ फेब्रुवारी २०२५
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.४ फेब्रुवारी २०२५