कानपूर : साखरपुडा ते लग्न… प्रत्येक जोडप्यासाठी एक सुवर्णकाळ.. या कोर्टशिप काळात एकमेकांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवून, एकमेकांचे विचार जाणून घेण्याची संधी.लग्न ठरलेल्या जोडप्यांसाठी हा काळ खूप खास असतो. प्रत्येकालाच आपल्या भावी जोडीदाराला भेटायची खूप इच्छा, उत्सुकता असते. लग्नानंतर खऱ्या संसाराला सुरूवात होते, प्रेम मागे पडतं, आणि रूटीनच्या चक्रात आपण अडकतो. त्यामुळे साखरपुडा ते लग्न सगळे भरभरून एन्जॉय करतात. पण काही वेळा असा एखादा टर्न येतो, की संपूर्ण आयुष्यच बदलून जातं.कानपूरमध्येही असंच काहीसं घडलं.
लग्नाला अवघे दहा दिवस उरलेले असतानाच, भावी वधूने नवऱ्याला नकार देत ते लग्न न करण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र तिच्या या नकारामुळे त्या तरूणाला इतका मोठा शॉक बसला की त्याचा जीवच गेला. हो, ही दुर्दैवी घटना अगदी खरी आहे. तरूणीने लग्नास नकार दिल्यामुळे अवघ्या 23 वर्षांच्या तरूणाचा शॉकने मृत्यू झाला. यामुळे त्याच्या घरच्यांवर तर दु:खाचा डोंगरच कोसळला आहे. ज्या घरात अवघ्या काही दिवसात शहनाईचे सूर वाजणार होते, तिथे आता फक्त आहे आक्रोश आणि मातम…
बाहेर गेल्यावर झाला वाद आणि तिने...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेम बाबू असे मृत तरूणाचे नाव असून तो कानपूर जवळील काकादेव येथील पाल बस्ती येथे रहायचा. तो ई-रिक्षा चालवायचा. 29 नोव्हेंबर रोजी त्याचं लग्न लागणार होतं. घरात त्याचीच धामधूम सुरू होती, सगळेजण तयारीत व्यस्त होते. मात्र 18 नोव्हेंबरला श्याम हा त्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत बाहेर गेला होता. तिथे काही कारणावरून त्यांचं भांडण झालं आणि तिने त्याच्याशी लग्न करायला थेट नकारच दिला.
घरी आल्यावर बिघडली तब्येत
त्यानंतर प्रेम कसाबसा घरी पोहोचला. लग्न मोडल्याचं ऐकून घरी सगळेच हबकले. पण प्रेम काहीच बोलला नाही. रविवारी संध्याकाळी मात्र त्याची तब्येत अचानक खूपच बिघडली. कुटुंबियांनी त्याला तातडीने कानपूरच्या लाला लजपत राय रुग्णालयात दाखल केलं. पण उपचारांदरम्यान रात्रीच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. तरण्या-ताठ्या मुलाचा असा अचानक जीव गेल्याे, त्याच्या कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकली. हॉस्पिटलमध्ये एकच हल्लकल्लोल माजला.
तरूणाच्या कुटुंबाचा तरूणीवर आरोपत्यानंतर तरुणाच्या कुटुंबीयांनी, जिने ठरलेलं लग्न मोडलं, ती तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांवर छळ केल्याचा आणि प्रेमकडून पैसे उकळल्याचा आरोप केला. तिच्यामुळेच आमच्या मुलाचा जीव गेला, असा आरोपही त्यांनी लगावला. संबंधित तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांवर कठोर कारवाईची मागणी करत त्यांनी रुग्णालयात एकच गोंधळ घातला.मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. तक्रार आणि शवविच्छेदन अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल, असे काकडेदेव पोलिस स्टेशनचे प्रभारी मानवेंद्र सिंह यांनी सांगितले.
हे पण वाचा
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम