नवी दिल्ली:- संसद भवनाच्या बाहेर दोन जणांनी फटाके फोडले. घोषणाबाजी केली. त्यानंतर हे दोघेही गॅस घेऊन प्रेक्षक गॅलरीत आले. तिथून हे दोघेही सभागृहात शिरले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. अचानक एक स्त्री आणि एक पुरुष सभागृहात आल्याने सर्वचजण धस्तावले. कोणतीही परवानगी नसताना आणि सभागृहाचे सदस्य नसताना दोन जण आत शिरल्याने सुरक्षा रक्षकांचीही तारांबळ उडाली.
या दोघांना पकडण्यासाठी एकच धावपळ सुरू झाली. या निमित्ताने संसदेच्या सुरक्षेचा पुन्हा एकदा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर लोकसभेचं कामकाज काही काळासाठी स्थगित करण्यात आलं.एक महिला आणि पुरुष एका खासदाराच्या पासवर संसदेत शिरले. संसदेच्या बाहेर आधी त्यांनी फटाके फोडले. यावेळी त्यांनी भारतमाता की जय, तानाशाही नही चलेगी… आदी घोषणा दिल्या. ट्रान्स्पोर्ट भवनाच्या बाहेर हा गोंधळ घालण्यात आला. यावेळी त्यांनी पिवळ्या रंगाचा गॅसही फोडला. त्यामुळे संसद भवन परिसर पिवळा झाला होता. त्यानंतर हे दोघेही संसदेच्या प्रेक्षक गॅलरीत आले. यावेळी त्यांनी जोरजोरात घोषणा देत संसद सभागृहात प्रवेश केला.
अखेर जेरबंद
अचानक दोन अज्ञात व्यक्ती संसदेच्या सभागृहात आल्याने एकच खळबळ उडाली. या दोघांना पकडण्यासाठी सुरक्षा रक्षक धावले. हे दोघेही सभागृहात इकडून तिकडे पळत होते. खासदारही या दोघांना पकडण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या हातात टिअर गॅस होता. हा पिवळा गॅस घेऊन ते सभागृहात शिरले होते. त्यामुळे सर्वच जण धस्तावले होते. अखेर सुरक्षा रक्षकांनी या दोघांना जेरबंद केलं.
म्हणून ते केलं
आमचं म्हणणं ऐकलं जात नाही. त्यामुळे आम्ही हे पाऊल उचलल्याचंत्यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं. पोलिसांनी या महिलेला आणि पुरुषाला अटक केली असून त्यांना पार्लियामेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात नेलं आहे. त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. हे लोक कशासाठी शिरले होते, कुणाच्या सांगण्यावरून आले होते, त्यांचा कुणाशी संबंध आहे, याची चौकशी केली जात आहे.
22 वर्षापूर्वीची पुनरावृत्ती?
आजच्याच दिवशी 22 वर्षापूर्वी म्हणजे 13 डिसेंबर 2001 रोजी संसदेवर दहशतवाद्यांचा हल्ला झाला होता. त्यावेळीही संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. बरोबर 22 वर्षानंतर आजच दोनजण संसदेत शिरल्याने खळबळ उडाली आहे.
हे पण वाचा
- वैद्यकीय सेवेसाठी कायम सहकार्य:-पालकमंत्री गुलाबराव पाटील; पालकमंत्र्यांचा डॉक्टर असोसिएशन मार्फत सत्कार
- अमळनेर येथे एमपीडीएतून सूटलेल्या,गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यावर अज्ञात व्यक्तिंनी लाठ्या काठ्यांनी केला जीवघेणा हल्ला.
- भडगांव महसुल विभागाची धडक कारवाई; अवैध वाळू चोरी करून वाहतुक करतांना २ डंपर जप्त
- आजचे राशी भविष्य बुधवार दि.५ फेब्रुवारी २०२५
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.४ फेब्रुवारी २०२५