एमपीडीए कायद्यांतर्गत जळगावचा एक गुन्हेगारावर स्थानबद्ध कारवाई.

Spread the love

जळगाव : एमपीडीए कायद्यानुसार जळगाव शहरातील एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार ललित उमाकांत दिक्षीत यास स्थानबद्ध करण्यात आले आहे. इश्वर कॉलनी भागातील रहिवासी गुन्हेगार ललित दिक्षीत याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला एकुण आठ गुन्हे दाखल आहेत.ललित दिक्षीत याच्याविरुद्ध चारवेळा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक दत्तात्रय पोटे, सहायक फौजदार अतुल वंजारी,

पोलिस नाईक सचिनपाटील, योगेश बारी, किशोर पाटील, छगन तायडे, किरण पाटील, साईनाथ मुंडे, राहुल रगडे, विशाल कोळी आदींनी ललित दिक्षीत यास मध्यवर्ती कारागृह नागपूर येथे स्थनबद्ध केले आहे. पोलिस अधिक्षक एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील व त्यांचे सहकारी सहायक फौजदार युनुस शेख, हे.कॉ. सुनिल दामोदरे, हे.कॉ. जयंत चौधरी, पो.कॉ. इश्वर पाटील आदींनी या प्रस्तावाला मुर्त स्वरुप दिले.

हे पण वाचा

टीम झुंजार