अमळनेर:- तालुक्यातील भरवस येथे महिलेसह तिच्या मुलीला मारहाण करणाऱ्या एकावर मारवड पोलिसांत विनयभंगासह इतर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक १८ रोजी सकाळी भरवस येथील ४० वर्षीय महिला घरी नसताना तिची मुलगी ही समाधान आव्हाडे याच्याकडे मजुरीचे पैसे देण्यास गेली असता त्याने किरकोळ कारणावरून मुलीला मारले. सदर महिला घरी आल्यावर त्याचा जाब विचारण्यासाठी गेली असता समाधान याने परत त्या मुलीला मारहाण करत
“तुला काय करायचे आहे करून घे, माझे कोणी वाकडे करणार नाही” असे बोलू लागल्याने सदर महिला त्यास समजावू लागली. मात्र त्याने अश्लील शिवीगाळ करत महिलेची साडी ओढून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत विनयभंग केला. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली, अशी फिर्याद सदर महिलेने दिल्यावरून समाधान रवींद्र आव्हाडे रा. भरवस याच्याविरुद्ध मारवड पोलिसांत भादवि कलम ३५४, २९४, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हे कॉ सचिन निकम हे करीत आहेत.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






