तळई ता.एरंडोल येथील शहीद आर्मी जवानांवर शासकीय इतमात शोकाकुल वातावरणात पुतण्याने दिला अंग्निडाग

Spread the love

एरंडोल :- युनिट २८६ मिडीयम रेजिमेंट तोफखाना कारगिल येथे कार्यरत असलेले हवालदार नितीन तुळशीराम पाटील (वय ४२) शुक्रवारी शहीद झाल्याने त्यांच्यावर शनिवारी सकाळी तळई (ता. एरंडोल) येथे शासकीय इतमात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पार्थिवाला मुख अग्नी मुलगी समृद्धी पाटील व काव्या पाटील यांनी दिला. गावातील तरुणांनी पाचशे मीटर लांबीचा तिरंगा राहत्या घरापासून ते अंत्यविधीसाठीच्या जागेपर्यंत झेंडा फडकवत निरोप दिला.राहत्या घरापासून वीर जवान अमर रहे, अशा घोषणा देण्यात आल्या.

तसेच महिलांनी आपल्या घरासमोर रांगोळ्या काढल्या. याप्रसंगी गावातील तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कुटुंबातील आई शांताबाई तुळशीराम पाटील, पत्नी शीतल पाटील, मुलगी समृद्धी पाटील तसेच मोठे बंधू नीलेश तुळशीराम पाटील यांचे अश्रू अनावर झाले. त्यांनी हंबरडा फोडाला. अंत्यविधीसाठी युनिट २८६ मिडीयम रेजिमेंट कारगिल गनर्स सोबत नायब सुभेदार मुलानी रहीम, बीएचएम चंद्रशेखर काळे, हवालदार विनोद पाटील, स्टेशन हेडकॉटर भुसावळतर्फे हवालदार महेशकुमार नायक, भूषण पाटील, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय जळगावचे नितीन पाटील, रतिलाल महाजन, लक्ष्मण मनोरे या अधिकाऱ्यांनी तसेच

पोलिस दलातर्फे हवेत तीन फेऱ्या झाडून मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी एरंडोल तहसीलदार सुचिता चव्हाण, नायब तहसीलदार दिलीप पाटील, मंडळ अधिकारी प्रमोद गायधनी तसेच कासोदा पोलिस ठाण्याचे पीआय योगिता नारखेडे, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, जिल्हा परिषद सदस्य नाना महाजन, शिवसेना जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, एरंडोल पंचायत समिती माजी सभापती दिलीप रोकडे, आनंदराव पाटील, तालुका काँग्रेस अध्यक्ष सुनील पाटील, शिवसेनेचे रवींद्र चौधरी, भाजप तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील, तळईचे सरपंच भाईदास मोरे, उपसरपंच प्रभाकर पाटील आदी उपस्थित होते.

हे पण वाचा

टीम झुंजार