पाचोरा :- नगरदेवळा ता. पाचोरा येथून जवळच असलेल्या बदरखे येथे सालाबादप्रमाणे पेमबुवा महाराजांची यात्रेनिमित्त तमाशाचा कार्यक्रम सुरु असतांना तमाशा बघण्यासाठी आलेल्या हनुमंतखेडा ता.सोयगाव. जि. संभाजीनगर येथील मनोज ज्ञानेश्वर निकम (२६) या युवकाचा मृतदेह २४ डिसेंबर रविवार रोजी तमाशा सुरू असलेल्या ठिकाणाहून काही अंतरावर २५ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
तरुणाच्या मृत्यूची प्राथमिक माहिती मृताचे काका नंदकिशोर पाटील यांनी नगरदेवळा औट पोस्टला दिली असता तात्काळ पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे, सहाय्यक फौजदार कैलास पाटील, मनोहर पाटील, अमोल पाटील, दिनेश पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन सदरील जागेचा पंचनामा करून मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला होता. मनोज निकम याच्या शरीरावर काही ठिकाणी मार लागल्याचे आढळून आल्यामुळे सदरील मृतदेह पुढील चौकशीकामी जळगाव शासकीय रुग्णालय येथे पाठविण्यात आला होता.
परंतु मनोज निकम याचा मृत्यू नेमका कश्यामुळे झाला हे अजून स्पष्ट झाले नाही. परंतु या तरुणाच्या मृत्यू मुळे परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. दरम्यान मनोज निकम याचा अकस्मात मृत्यू झाला नसून त्याचा खुन करण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी करत मारेकऱ्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीवर ठाम होते.
खुनाचा गुन्हा दाखल,
नंदकिशोर पाटील यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध विरुध्द खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ हे करीत आहे. या प्रकरणी पोलिसांनी तमाशातील काहींना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय येरुळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसन नजनपाटील, पोलिस निरीक्षक राहुल खताळ हे संशयितांसह घटनास्थळी दाखल होवून चौकशी सुरू आहे.
हे पण वाचा
- एरंडोल विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमोलदादा पाटील यांचा एकतर्फी विजय,५६ हजार ३३२ मतांनी दणदणीत विजय.
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन
- पतीच्या उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूनंतर तीन तासांत पत्नीने संपवली जीवन यात्रा; दोघांचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार
- सोशल मिडीयावर माळी समाजावरील आक्षेपार्ह मजकुराच्या निषेधार्थ एरंडोल बंद; माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांच्या पुतळ्याचे दहन.