आपल्या नवऱ्याचे अनैतिक संबंध असल्याचे बायकोला समजल्यानंतर त्याला अद्दल घडवण्यासाठी बायकोने टोकाचे पाऊल उचलले आहे. एका व्यक्तीचे त्याच्याच भाचीसोबत अनैतिक संबंध होते. त्यानंतर त्या दोघांना पत्नीने नको त्या अवस्थेत पकडले होत. त्यावरून त्या दोघांमध्ये प्रचंड वादही झाले होते. त्यानंतर तिने एक दिवस पतीला झोपायला सांगितले. त्यावेळी तिने त्याच्या हात पाय बांधले आणि वस्तरानेच त्याचे लिंग कापले त्यानंतर ते लिंग तिने टॉयलेटमध्ये फेकूनही दिले होते.
पत्नीने दिली गुन्ह्याची कबूली
पतीचे अनैतिक संबंध असल्याचे कळल्यापासून त्याची पत्नी त्याच्यावर रागातच होती. त्यामुळे तिने त्याचे लिंग कापण्याआधी त्याच्या प्रायव्हेट पार्टचे तिने फोटोही काढले होते. पतीवर तिने या प्रकारचा हल्ला केल्या नंतर ती स्वतःच पोलिसात हजर होऊन तिने आपल्या गुन्ह्याची कबूली दिली. तर तिचा नवऱ्याला आता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
लिंग कापून टॉयलेटमध्ये फेकले
ब्राजीलमध्ये राहणाऱ्या महिलेवर तिच्या 39 वर्षाच्या पतीचे लिंग कापून ते टॉयलेटमध्ये फेकल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्या प्रकरणी आता तिच्यावर पतीची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.
भाचीबरोबर अनैतिक संबंध
पोलिसांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, बायकोने पतीवर हल्ला करून ती पोलिसात हजर झाली. त्यानंतर तिने सांगितले की, माझ्या नवऱ्याचे आणि 15 वर्षाच्या भाचीचे अनैतिक संबंध होते आणि तिने त्या दोघांना नको त्या अवस्थेत बघितले होते. त्यामुळे ती नवऱ्यावर प्रचंड रागात होती, त्यानंतर तिने नवऱ्याचा बदला घेण्याचा ठरवले.
नंतर फोटोही काढले
नवरा एक दिवस घरी आल्यावर त्याला आमिष दाखवून त्याला बेडवर झोपायला सांगितले. त्यानंतर त्याचे हात-पाय दोरीने बांधण्यात आले, आणि वस्तारा घेऊन तिने त्याचे लिंग कापले आणि त्याचे तुकडे तुकडे करून ते टॉयलेटमध्ये फेकून दिले.न्यूयॉर्क पोस्ट आणि डेली मेलच्या वृत्तानुसार सांगण्यात आले आहे की, नवऱ्याचे लिंग कापून ती थांबली नाही तर त्यानंतर तिने त्याचे फोटोही काढले व नंतर ते टॉयलेटमध्ये फेकून देण्यात आले.संमतीचे वय 14 वर्षेडेली मेलच्या वृत्तानुसार महिलेने पोलिसांना सांगितले की त्याचा प्रायव्हेट पार्ट कापल्यानंतर तो तो पुन्हा जोडण्याची शक्यता होती, त्यामुळे त्याचे तुकडे केले आणि ते टॉयलेटमध्ये फेकून दिले. सध्या त्या जखमी पतीवर उपचार सुरू असून त्याच्यावर उपचार करण्यात येत आहे. ब्राझीलमध्ये संमतीचे वय 14 वर्षे आहे, तर तिच्या पतीने त्यच्या 15 वर्षांच्या भाचीसोबत लैंगिक संबंध ठेवले होते, त्यामुळे हल्ला केलेल्या महिलेची कसून चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिसानी सांगितल्याचे डेली मेलने सांगितले.
हे पण वाचा
- धक्कादायक! गेल्या चार वर्षांपासून पोलीस चौकीत हवालदार म्हणून तैनात, सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह, वसुली सुरू, अन् एके दिवशी असा झाला पर्दाफाश.
- प्रसूतीसाठी वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भवती मातेच्या तडफडून मृत्यू; पोटातील बाळही दगावले.
- खळबळजनक! शिक्षक दाम्पत्याने मुलीसह रेल्वे रुळावर झोपून संपवले जीवन; एकाच चितेवर तिघांच्या अंत्यसंस्काराने गाव झाले सुन्न.
- नातेवाईकांकडे लग्नासाठी जात असलेल्या होंडा सिटी कारला भरधाव वेगाने येत असलेल्या ऑडी कारने धडक दिल्याने सुरत येथील दाम्पत्य ठार
- घर घर संविधान मोहिमेमध्ये सर्वांनी योगदान द्यावे-भरत शिरसाठ जळगाव शहर व तालुका सभा संपन्न