महिलेच्या डोक्यावर विळ्याने वार करून केले गंभीर जखमी,चौघांविरुद्ध गुन्हा दाखल-

Spread the love

झुंजार प्रतिनिधी । एरंडोल
एरंडोल :- येथील गजमल नगर येथे शुल्लक कारणावरून भांडण झाल्यामुळे तीन महिला व एक पुरुष मिळून एका महिलेच्या डोक्यावर विळ्याने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना दि 22 मार्च रोजी 10 वाजेच्या सुमारास घडली गंभीर जखमी झालेल्या महिला हिच्यावर जळगाव येथे उपचार सुरू आहे. जखमी झालेल्या महिलेने जळगाव येथे दिलेल्या जबाब नुसार आज दिनांक 23 मार्च रोजी एरंडोल पोलीस स्थानकात तीन महिला व एका पुरुषांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की विखरण रस्त्यावरील गजमल नगर येथे आशाबाई दत्तात्रय चौधरी वय 45 व्यवसाय मजुरी ह्या आपले पती व दोन मुलांसह राहतात व शिवणकाम करून आपल्या घराचा उदरनिर्वाह करतात. दि. 22 मार्च रोजी 10.00 वा चे सुमारास पती दत्तात्रय विठोबा चौधरी हे बकरी बांधण्यासाठी जात असतांना त्यांच्या घरासमोर राहत असलेले मनिषा सपकाळे, ममता सपकाळे, मोना सपकाळे,व दीपक मेहराडे हे चौघे जण आशाबाई व त्याचे पती यांना शिवीगाळ करू लागले त्यावेळी आशाबाई चौधरी यांनी विचारले की तुम्ही तिन्ही शिवीगाळ का करत आहेत विचारले असता या तीन महिला व एका पुरुषाने आशाबाईंना धमकी दिली की तुम्हाला जिवंत सोडणार नाही

असे सांगुन घरातुन विळा आणुन आशाबाई चौधरी यांच्या डोक्यावर मारुन त्यांना खाली पाडून चौघांनी मिळून मारहान केली. आशाबाई चौधरी या गंभीर जखमी झाल्यामुळे त्या बेशुध्ध झाल्या. त्यांच्या वेळी त्यांच्या शेजारी राहणारे लखन पुरुषोत्तम बनसोपानी त्यांचे सोबत साहेबराव रामसिंग सपकाळ यांनी आशाबाईना एरंडोल ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून तात्काळ 108 अंबूलस ने जळगाव येथे हलविण्यात आले.

दरम्यान जळगाव येथे आशाबाई चौधरी यांनी दिलेल्या जबाबावरून मनीषा सपकाळे व त्यांच्या दोन मुली ममता सपकाळे व मोना सपकाळे तसेच दीपक मेहराडे यांच्या विरोधात एरंडोल पोलीस स्थानकात 324,504,506 34 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सुनील लोहार हे पुढील तपास करीत आहेत.

टीम झुंजार