नागपूर: गेल्या २०१४ च्या निवडणुकीत भाजप शिवसेना एकत्र लढत सत्ता मिळविली होती. मात्र त्यानतंर भाजपला दूर ठेवत राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षाने एकत्र येत महाविकास आघाडी सरकार स्थापन केली. भविष्यात शिवसेना-भाजप एकत्र लढणार का? असा प्रश्न उपस्थित होत असतानाच शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी शिवसेना-भाजप एकत्र येणार नाही.
एखादी भूमिका घेतली की त्यावरून शिवसेना मागे येणार नाही. ज्या पद्धतीनं 25 वर्ष एकत्र काम केलं. ते विसरुन भाजप सूडानं वागतंय. त्यामुळे एकत्र येणं शक्य नाही, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी नागपुरात मीडियाशी संवाद साधताना स्पष्ट केलं. त्यामुळे आगामी काळात शिवसेना-भाजप युती होणार नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं असून युतीच्या चर्चांनाही पूर्णविराम मिळाला आहे.
तसेच शिवसेनेची आगामी वाटचाल काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबतच होणार असल्याचेही संकेत मिळत आहेत. भाजपचा भगवा आहे की नाही? भगव्याचा दांडा फक्त आमचाच आहे. भाजपचा आहे की नाही माहित नाही, असा चिमटाही राऊत यांनी काढला. तसेच राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.