मग कमी भ्रष्टाचार करा.जितेंद्र आव्हाड यांच्या त्या वक्तव्यावर नितेश राणे यांनी जोरदार टीका

Spread the love

मुंबई :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्यावर ईडी कारवाई केल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. ईडी कारवाईनंतर ‘आपल्या मुलीला आपण महाराष्ट्रात ठेवणार नाही’ असे राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले होते. त्यावर आता नितेश राणे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. वडील म्हणून कमी भ्रष्टाचार करा. अशी खोचक टीका नितेश राणे यांनी केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने मंगळवारी कारवाई केली. त्यात ईडीने त्यांची 6.45 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. त्यात ठाण्यातील 10 फ्लॅट्सचा समावेश आहे. ईडीने पाटणकर यांच्यावर कारवाई केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी राज्यात सुडाचे आणि द्वेषाचे राजकारण सुरू असून, माझ्या मुलीला मी महाराष्ट्रात ठेवणार नाही. असे वक्तव्य केले होते. त्यावर आता नितेश राणे यांनी उत्तर दिले आहे.

नितेश राणे यांनी म्हटले आहे की, मंत्री असे बोलत असतील तर हे दुर्दैव आहे, मी म्हणतो मग कमी भ्रष्टाचार करा. असा सल्ला नितेश राणे यांनी जितेंद्र आव्हाड यांना दिला आहे.

टीम झुंजार