5 लाख रुपये किमतीचे खैर प्रजातीच्या लाकूडाची अवैध वाहतूक करताना बोलेरो पीक अप वाहन वन विभागाने केले जप्त.

Spread the love

जळगाव :- आज दिनांक 02/01/2024 वार मंगळवार रोजी मिळालेल्या गुप्त बातमी वरून वनपाल गस्ती पथक व रेंज स्टाफ यावल पश्चिम सह शासकीय वाहनाने नायगाव किनगाव रस्त्यावर गस्त करीत असताना किनगावकडे जात असतांना बोलेरो पीक अप MH04 GR 4353 संदिग्ध वाहन भरधाव वेगाने जात असता त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला असता वाहन चालक वाहन सोडून अंधारात फ़रार झाला. सदर वाहनाची तपासणी केली असता त्यात खैर प्रजातीचे लाकूड मिळून आले. वाहन जप्त करून शासकीय विक्री आगार यावल येथे आणून पावतिने जमा केला.

जप्त माल महिंद्रा बोलेरो पिकअप व त्यात असलेले खैर जातीचे लाकूड अंदाजे 5.000 घन मीटर वाहन तसेच मालाची बाजार भावानुसार अंदाजित किंमत 5 लाख रुपये एवढी आहे.

सदर कार्यवाहीत आर बी थोरात वनपाल गस्ती पथक, विपुल पाटील वनपाल वाघझिरा, अक्षय रोकडे वनरक्षक निंबादेवी, चेतन शेलार वनरक्षक मनूदेवी, योगिराज तेली वाहन चालक तसेच सचिन तडवी पोलिस कांस्टेबल यांनी सहभाग घेतला.

सदर कार्यवाही ही म. हृषिकेश रंजन साहेब वनसंरक्षक धुळे, श्री. जमीर शेख उपवनसंरक्षक यावल वनविभाग जळगाव, म. आर आर सदगीर विभागीय वनाधिकारी दक्षता पथक धुळे म. प्रथमेश हडपे सहाय्यक वन संरक्षक यावल म श्री अजय बावणे वनक्षेत्रपाल गस्ती पथक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे .

म.वनक्षेत्रपाल गस्ती पथक यावल यांजकडून जनतेस आवाहन करण्यात येते की, वन व वन्यजीव तसेच अवैधवाहतूक लाकूड संबधित कुठाला गैरप्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ टोल फ्री नंबर 1926 वर संपर्क करावा ही विनंती

हे पण वाचा

टीम झुंजार