सात बलून बंधाऱ्याच्या पर्यावरण मान्यतेसाठी गिरणाकाठावरील लाखो जनतेच्या सह्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांकडे देणार खा. उन्मेशदादा पाटील

Spread the love

गिरणा परीक्रमेच्या बाराव्या टप्प्याला उत्राण येथून सुरवात: नागदुली येथे समारोप : उत्राण ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

गिरणा परिक्रमा देशासाठी मार्गदर्शक ठरेल
किशोर काळकर यांचे प्रतिपादन

झुंजार प्रतिनिधी। उत्राण
एरंडोल:-
गिरणेची परीक्रमा ही मतांसाठी नव्हे तर गिरणा काठावरील लोकांचे मने जोडण्यासाठी आहे. या राजकारण विरहित शुध्द हेतूने खासदार उन्मेशदादा पाटील यांनी तिरंगा हातात घेऊन चारशे किलोमीटर पायी चालत गिरणा परीक्रमा सूरू केली आहे. मी देखील आतापर्यंत साधू संतांची परिक्रमा होते हे ऐकले होते. माञ एक युवा खासदार उन्मेशदादा पाटील आपल्या मतदारसंघातील गिरणा काठावरील जनतेच्या भल्यासाठी पायी परिक्रमा करीत आहेत. आज वर साधू संतांची परिक्रमा ऐकली होती माञ आज पुढाऱ्यांची परिक्रमा अनुभवली असून ही गिरणा परिक्रमा देशासाठी मार्गदर्शक ठरेल- असा विश्वास अनुसूचित जनजाती प्रदेश संयोजक ऍड.किशोर काळकर यांनी व्यक्त केला आहे.

आज त्यांच्या उपस्थितीत गिरणा परिक्रमेचा शुभारंभ उत्राण येथे जलपूजन करुन करण्यात आले. आज गिरणा परीक्रमेच्या बारावा टप्प्यास उत्राण येथून सुरवात झाली. गिरणेच्या काठाला चालत सुमारे चारशे किलोमीटरची ही परिक्रमा रात्री नऊ वाजता हनुमंतखेडा, भातखेडे, पिंप्रिसिम, दौलतपुरा मार्गे नागदूली येथे संपन्न झाली.
मान्यवरांच्या उपस्थितीत जलपूजन
गिरणा परिक्रमेस सकाळी दहा वाजता जलपूजन करुन सुरूवात करण्यात आली. खासदार उन्मेश दादा पाटील , अनुसुचित जनजाती प्रदेश संयोजक ऍड.किशोरजी काळकर यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.

याप्रसंगी एरंडोल नगरीचे नगराध्यक्ष रमेश काका परदेशी, सरपंच चंद्रकांत दादा वाघ, सरपंच भागवत पाटील, उपसरपंच योगेश महाजन, ज्येष्ठ मार्गदर्शक सुनीलभैय्या पाटील, तालुका सरचिटणीस अमोल जाधव, राजेंद्र पाटील, माजी अध्यक्ष भिकनभाऊ कोळी , जळगाव पंचायत समितीचे सदस्य ऍड.हर्षल चौधरी,भाजपा शहराध्यक्ष निलेश परदेशी, नगरसेवक एड. नितीन महाजन, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष आबा चौधरी, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष नरेशदादा ठाकरे, व्यापारी आघाडीचे माजी अध्यक्ष सचिन सोनार, ज्येष्ठ मार्गदर्शक शंकरबापू चौधरी,प्रकाश कुवर ,जितूभाई चौधरी, राजूभाऊ मिस्त्री, सुनील बोरसे, सुरेश महाजन ,ज्ञानेश्वर कंखरे, विलासराव चौधरी, पांडुरंग चौधरी, योगेश चौधरी,वाल्मिक ठाकरे मैत्री सेवा फाऊंडेशनचे सर्व कार्यकर्ते पत्रकार बांधव यांचेसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खासदार उन्मेश दादा पाटील यांनी आपली भूमिका मांडली ते म्हणाले की
गिरणा नदीवरील रखडलेले बलून बंधाऱ्याच्या पर्यावरण मान्यतेसाठी गिरणाकाठावरील लाखो जनतेच्या सह्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देणार असून गिरणा परिक्रमेत वाढता जनसहभाग लोकचळवळ ठरत असल्याचा आनंद असून गिरणेच्या शाश्वत विकासाकरीता कटिबध्द असल्याचे प्रतिपादन खासदार उन्मेशदादा पाटील यांनी व्यक्त केले.

जागोजागी उत्स्फूर्त स्वागत
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गिरणेच्या संवर्धनासाठी ही परिक्रमा आयोजित करण्यात आली असून गावोगावी ढोलताशांच्या गजरात गावकऱ्यांकडून उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले.
खासदार उन्मेशदादा पाटील म्हणाले. गिरणा नदी सध्या आयुसीत आहे. ती अजुन मृतावस्थेत गेलेली नाही त्यामुळे वेळीच जलप्रदूषण, वाळू उपसा थांबविणे आवश्यक असल्याचे मत जलतज्ञ राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केले आहे. त्याची गांभीर्याने दखल घ्यावी लागणार आहे. गिरणा नदीत प्रचंड वाळूची संपत्ती आहे. मात्र अवैध वाळू उपसाने गिरणेचे वस्रहरण होत आहे. वाळू नदीचे फुफ्फुस असुन बेसुमार वाळू उपसा थांबविणेचे आवाहन गिरणा काठच्या ग्रामस्थांना समोर आहे. अतिक्रमण, प्रदूषण, शोषण थांबवून गिरणेचे पुनरूज्जीवन करण्यासाठी आपण सर्वानी सहभागी होण्याचे आवाहन खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केले.

ते पुढे म्हणाले की, गिरणा नदीत प्रचंड वाळूची संपत्ती आहे. मात्र अवैध वाळू उपसाने गिरणेचे वस्रहरण होत आहे.बहूतांश शहरातील सांडपाणी हे गिरणेत सोडले जाते.त्यासाठी काठावरील प्रत्येक गावांमध्ये जलसंधारण, मृद्संधारण, बांबु लागवड तसेच घन कचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यासाठी मोहीम हाती घेणार असून यासाठी गिरणा वाटप वॉटर कप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेतून ग्रामपंचायतींना गावकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन करीत कोट्यावधी रुपयांचे बक्षीस आपल्या गावाच्या विकासासाठी देण्यात येणार आहे.असेही त्यांनी सांगितले.

यावेळी प्रास्ताविक भाजपचे ज्ञानेश्वर कंखरे(तळई) यांनी केले. तालुका सरचिटणीस अमोल जाधव यांनी सूत्रसंचालन केले. पाहुण्यांचे स्वागत आभार प्रकाश कुंवर यांनी केले.

टीम झुंजार