बिहार :- विद्यार्थी व शिक्षकांचे नाते पवित्र असते. पण, ब-याच वेळा वयाचे बंधन झुकारुन हे दोघेही प्रेमात पडतात. जुली व मटुकनाथची लव्ह स्टोरी तर सर्वत्र गाजली. त्यानंतर बिहारमधील ५० वर्षाच्या शिक्षकाने २० वर्षाच्या स्टुंडंटबरोबर केलेले लग्नही चर्चेचे ठरले. पण, आता या शिक्षकांचे लग्न सोशल मीडियात चांगलेच व्हायरल होत आहे. पण, हा शिक्षक नेमका कुठला आहे हे मात्र कळत नाही.
विशेष म्हणजे आपल्या लग्नाची बातमी त्याने स्वत:च सांगितली आहे.सर्वत्र प्रसारीत होणा-या व्हिडिओमध्ये हा शिक्षक सांगतो की ही माझी स्टुडंट होती. हिच्याकडे १० हजार रुपये ट्युशन फी बाकी होती. त्यामुळे करायचं काय तर मी तीच्य़ाशी लग्नच केले. केवळ ट्युशन फी दिली नाही म्हणून ५० हून अधिक वय असलेल्या या शिक्षकांने केलेले हे लग्न टीकेचा विषय बनला आहे.
लग्न करणारा हा शिक्षक धोती व कुर्ता घातलेला आहे. तर त्याची ही स्टुंडंट ही शाळेच्या ड्रेसवर दिसत आहे. शिक्षकांचे विद्यार्थींनीवर प्रेम जडते त्यावेळेस वयाचे बंधन नसते. पण, ही प्रेमाची गोष्ट नाही तर थेट हा व्यवहार केला व त्यातून हे लग्न केल्याचे दिसते. त्यामुळे सोशल मीडियावर चांगलीच टीका होत आहे.
हे पण वाचा
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
- शहापूर चोरीच्या घटनेतील आरोपी जामनेर पोलिसांनी शोधला ; – जामनेर पोलीसांची यशस्वी कामगिरी
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती






