आताची मोठी बातमी! चेन्नई सुपर किंग्जने कर्णधार बदलला, धोनी ऐवजी आता कोणत्या खेळाडूकडे आहे कर्णधारपदाची धुरा

Spread the love

चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. आयपीएलला अवघे दोन दिवस शिल्लक असताना कर्णधार महेंद्रसिंग याने चेन्नई संघाच्या कर्णधार पदाची धूरा दुसऱ्या खेळाडूकडे सोपवली आहे. प्राप्त माहितीनुसार चेन्नई संघ व्यवस्थापनाने पुर्वनियोजीत धोरणानुसारच हा बदल केला आहे.

महेंद्रसिंग धोनी या खेळाडू नंतर चेन्नई सुपर किंग्जच्या संघात सर्वात जुना,अनुभवी आणि विश्वासू असणारा तसेच ज्या ज्यावेळेस संघ संकटात असतो त्या वेळी चेन्नई संघाला संकटातून बाहेर काढून नेण्याच्या प्रक्रियेत चेन्नई संघाचा पहिली पसंती राहिलेल्या अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा याच्याकडे चेन्नई संघाची धूरा सोपावण्यात आली आहे. जडेजा हा संघासाठी महत्वाचा खेळाडू असला तरीही चेन्नई संघाच्या यशस्वी असलेला व चाहत्यांना हवाहवासा असलेला महेंद्रसिंग धोनी कर्णधारपदी नसणार, याबद्दल दुःख वाटत असणार, हे वेगळे सांगायला नको.

टीम झुंजार