एक्स गर्लफ्रेंडला धडा शिकवण्यासाठी,तिचे न्यूड फोटो संभाषणाच्या व्हॉइस क्लिप पेन ड्राइव्हमधून पतीसह 11 जणांना पाठवले, अन् 3 महिन्यांनी….

Spread the love

नागपूर :- एक्स गर्लफ्रेंडचा बदला घेण्यासाठी नागपुरातील एका व्यक्तीने भयानक खेळ रचला. एक्स गर्लफ्रेंडचा धडा शिकवण्यासाठी त्याने मोठ्या हुशारीने तिचे न्यूड फोटो व त्यांच्यातील झालेल्या संभाषणाच्या व्हॉइस क्लिप पेन ड्राइव्हमधून तिच्या पतीसह 11 जणांना पाठवल्या. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात एका व्यक्तीला अटक केली आहे. नागपुरात ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 43 वर्षांच्या व्यक्तीने त्याच्या एक्स गर्लफ्रेंडचे न्यूड फोटो आणि त्यांच्यातील खासगी संभाषण पेन ड्राइव्हमधून 11 जणांना पाठवले.

पोस्टाच्या माध्यमातून त्याने हे पेन ड्राइव्ह 11 जणांना पाठवले. यामध्ये तरुणीच्या पतीचाही समावेश आहे. व्यवसायात झालेल्या नुकसानीनंतर आलेल्या नैराश्याने त्याने हा कारनामा केल्याचे समोर आले आहे. आरोपीला एका महिला सहकाऱ्यानेही साथ दिल्याचे उघड झाले आहे. गेल्या वर्षी उघडकीस आलेल्या या प्रकरणाचा तपास पोलिसांनी गोपनीय ठेऊन केला होता आणि आरोपीला 6 जानेवारीला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात या खळबळजनक प्रकार घडला होता.

त्या प्रकरणात आता 6 जानेवारी रोजी आरोपीला अटक केली आहे. आरोपीने एका व्यक्तीसोबत भागीदारीत व्यवसाय करत होता. त्यांचा हा व्यवसाय फार काही चालला नाही व डबघाईला गेला. त्यानंतर त्याने त्याच्या प्रेयसीवर निशाणा साधला आणि तिचे खासगी फोटोंचा गैरवापर केला. पोलिसांनी आरोपीची चौकशी केल्यानंतर त्याने आपला गुन्हा कबुल केला आहे. इर्ष्या आणि बदला घेण्यासाठी त्याने हे पाऊल उचलले आहे. पोलिसांच्या तपासात समोर आले आहे की, आरोपीने गुप्तपणे त्याच्या एक्स प्रेयसीच्या व्हॉट्सअॅप अकाउंटला त्याच्या लॅपटॉपवर लिंक केले होते.

जेणेकरुन तिचे खासगी चॅट त्याला सहजपणे मिळतील. या पद्धतीने त्याने तिच्या चॅटिगचा मोठा डेटा एकत्र केला होता.नागपुर पोलिसांनी या प्रकरणात तीन महिन्यांचा वेळ घेत आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या निगराणी खाली झाला. त्यांनी सायबर पोलिस उपायुक्त अर्चित चांडक आणि एक वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे या तपासाची धुरा सोपवली होती. या प्रकरणात पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली होती. या प्रकरणातील आश्चर्यकारक बाब म्हणजे, आरोपीने स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी स्वतःलाही पेनड्राइव्ह असलेला लिफाफा पोस्ट केला होता.

हे पण वाचा

टीम झुंजार