प्रतिनिधी l यावल
माझे लग्न जुळवून दे या कारणावरून वडील टाळाटाळ करीत असल्यामुळे वडिलांच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून मुलाने वडिलाला यम सदनी पाठवल्याची घटना पिळोदा खुर्द तालुका यावल येथे घडली असून याबाबत यावल पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अवघ्या काही तासातच आरोपीला अटक केली आहे पिळोदा खुर्द तालुका यावल येथे देवानंद रतन कोळी या तरुणांन त्याचे वडील रतन तानसिंग कोळी वय 73 देवानंद कोळी हा माझे लग्न करून द्या असे कारण सांगीत होता मात्र वडील त्याला टाळाटाळ करीत होते
या कारणावरून आरोपी देवानंद कोळी याने 14 जानेवारी 23 रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास वडिल झोपेत असताना डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून यम सदनी पाठवल्या प्रकरणी खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून यावल पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे सुभाबाई रतन कोळी यांच्या फिर्यादीवरून देवानंद रतन कोळी मुलाच्या विरोधात तिचे पती रतन तानसिंग कोळी यांना कुऱ्हाडीने मारहाण केल्याप्रकरणी मरण पावल्याप्रकरणी फिर्याद दिल्याने यावल पोलिसांनी गु र नंबर 9/ 24 भादवि कलम 302 प्रमाणे दाखल करण्यात आला असून पुढील तपास फैजपुर उपविभागीय अधिकारी अन्नपूर्णा सिंह यांच्या आदेशान्वये यावल पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार राजेंद्र साळुंखे पुढील तपास करीत आहेत

माहिती मिळताच पोलीस निरीक्षक यांनी तात्काळ भेट देत पंचनामा केला व मयताची डेड बॉडी यावल ग्रामीण रुग्णालयात आणून यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत जावळे यांनी केले सदर घटनास्थळी फैजपूर विभागाच्या पोलीस अधिकारी अन्नपूर्णा सिंह यांनी भेट दिली व तपासाच्या दृष्टिकोनातून पुढील सूचना दिल्या

हे पण वाचा
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.
- आजीची शेवटची इच्छा माझ्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसह अंतिमसंस्कार करा.पण चोरट्यांनी साधला डाव,अंत्यसंस्कारानंतर महिलेच्या अस्थींची चोरी.
- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दुय्यम निंबधक कार्यालयात छापा,अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये सापडले पैसे
- महाराष्ट्रातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित
- मुलीचा प्रथम वाढदिवस कन्या बचाव जागर कार्यक्रमाने साजरा