पारोळा :- तालुक्यातील म्हसवे येथे ५८ वर्षीय शेतकऱ्याने सोसायटीचे व हात उसनवारीचे कर्ज कसे फेडायचे या विवच्णेत विषारी पदार्थ पिऊन आत्महत्या केल्याची घटना १८ रोजी सकाळी १० वाजता उघडकीस आली आहे. अर्जुन सुकदेव पाटील असे मृताचे नाव आहे. अर्जुन पाटील हे शेतकरी सकाळी आपल्या शेतात गेले होते. दुपारी एक वाजेच्या सुमारास त्यांच्या तोंडातून फेस येऊन उग्र वास येत असल्याचे त्यांच्या भावाला लक्षात आले.त्यांना त्या ठिकाणाहून औषध उपचारासाठी कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तेथे सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित केले. याबाबत पुतण्या चिमणराव पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान मृत शेतकरी यांच्यावर सोसायटीचे व हात उसनवारीचे कर्ज होते. त्यामुळे ते नेहमी नैराश्यात असल्याची माहिती चिमणराव पाटील यांनी दिली आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहे.
हे पण वाचा
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम