झुंजार प्रतिनिध । एरंडोल
एरंडोल :- तालुक्यातील कढोली येथील 53 वर्षीय पुरुषाने घरातील छताच्या लोखंडी राँडला नायलॉनची दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक 25 मार्च रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की नाना आधार कोळी वय 53 वर्षे आपल्या पत्नी, दोन मुले, दोन मुली, एक सून राहतात. नातेवाईक कडे लग्न असल्यामुळे पत्नी मोठा मुलगा सून व मुली त्या ठिकाणी गेले होते तर लहान मुलगा हा खाजगी कंपनीत कामावर गेला होता.
दुपारी दीड वाजेच्या सुमारास लहान मुलगा पवन नाना कोळी हा कामावरून घरी आल्यानंतर घरा
त प्रवेश करुन वरील मजल्यावरील रुम वर गेलो असता त्याचे वडील नाना आधार कोळी यांनी सदर रुमचे छताच्या •
लोखंडी रॉड ला नायलॉन दोरीने गळफास घेतला असल्याचे त्यास दिसले त्यानंतर त्याने त्याचे काका ईश्वर भास्कर नन्नवरे, व ईतर नातेवाईक किरण राजेंद्र नन्नवरे, आकाश शरद कोळी, भूषण अरुण बडगुजर अशांच्या बोलावून त्यांच्या मदतीने नाना आधार कोळी यांना खाली उतरवून त्यांना ग्रामीण रुग्णालय येथे उपचार साठी दाखल केले असता नाना आधार कोळी यांना डॉक्टरांनी तपासुन मयत घोषीत केले. मयत नाना आधार कोळी यांनी आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही. याबाबत एरंडोल पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक शरद बागर यांचे मार्गदर्शनाखाली राजेश पाटील हे पुढील तपास करीत आहेत.