अखेर बालकल्याण समिती बरखास्त ;आठ दिवसापासून अन्नत्याग उपोषणास बसले मासू विदयार्थी संघटनेचे उपोषण मागे.

Spread the love

एरंडोल तालुक्यातील खडके येथील बालगृह अत्याचार प्रकरण!

जळगाव,(प्रतिनिधी)- अखेर बालकल्याण समिती बरखास्त करण्यात आली असून याबाबतचे राजपत्र दिनांक २५ जानेवारी रोजी राज्यपाल यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनाचे सचिव वि. रा. ठाकूर यांनी काढले आहेत,बालगृह अत्याचार प्रकरणी गुन्हे दाखल असलेल्या बालकल्याण समिती बरखास्त करण्यात यावे या मागणीसाठी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे राज्य उपाध्यक्ष ॲड. दिपक सपकाळे, जिल्हाध्यक्ष रोहन महाजन, महानगराध्यक्ष प्रथमेश मराठे यांनी गेल्या आठ दिवसापासून अन्नत्याग उपोषण सुरु केले होते.

दरम्यान बालकल्याण समिती समाप्तीचे आदेश जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ. वनिता सोनगत यांनी दि.२६ जानेवारी रोजी उपोषणस्थळी येत आदेशाची प्रत देऊन उपोषण सोडले.सविस्तर असे की,जळगाव जिल्ह्यातील खडके, ता. एरंडोल येथे कै. य. ब. पाटील मुलींच्या बालगृहात लैंगिक शोषणाची गंभीर स्वरुपाची घटना घडल्या प्रकरणी बाल कल्याण समितीचे अध्यक्ष श्रीमती देवयानी गोविंदवार, सदस्य श्रीमती विद्या बोरनारे व सदस्य श्री. संदीप पाटील यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता

त्यानंतर बालकल्याण समिती बरखास्त करण्यासाठी विदयार्थी संघटनेने वेळोवेळी तक्रारी करून पाठपुरावा केला होता मात्र शासनाला जाग येतं नव्हती त्यानंतर महाराष्ट्र स्टुडंट युनियनने दिनांक १९ जानेवारी पासून उपोषण सुरु केले होते, बालकल्याण समिती बरखास्त होणार नाही तोपर्यंत अन्नत्याग उपोषण सोडणार नसल्याचे जाहीर केले होते. अखेर बालकल्याण समिती बरखास्त करण्यात आली असून याबाबतचे राजपत्र दिनांक २५ जानेवारी रोजी राज्यपाल यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनाचे सचिव वि. रा. ठाकूर यांनी काढल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार