दारूबंदीसाठी सबगव्हानला महिलांसह ग्रामस्थ एकवटले, ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव पारित करून गाठले पोलीस ठाणे.

Spread the love

पोलिस गावकऱ्यांच्या पाठीशी, त्वरित कारवाईचे दिले आश्वासन.

अमळनेर :- पाडळसरे येथून जवळच असलेल्या सबगव्हान गावी गावठीदारूची सर्रास व खुलेआम विक्री होत असून दारू पिनाऱ्यामुळे महिला वर्ग बेजार झाल्या आणि त्यामुळे त्यांचा कुटुंबातील वातावरण ढवळून निघाले असल्याने दारू पिऊन अनेकांना कौटुंबिक ताणतणावाचा सामना करावा लागतो ,म्हणून गावातील महिला व युवकांनी पुढाकार घेत प्रजासत्ताक दिनी ग्रामपंचायत कार्यालय गाठून दारूविक्री तसेच बंदीचा ठराव मांडला आणि तो सर्व संमतीने पारित केला , त्या ठरावाची नक्कल व सरपंच ग्रामसेवक यांचे पत्र घेऊन थेट मारवड पोलीस ठाण्यात दाखल होऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक यांना दारूबंदीसाठी कारवाई करण्याबाबत ग्रामस्थांकडून ठरावाची नक्कल आणि निवेदन सादर केले

व महिलांनी दारूबंदी गावात कशी गरजेची आहे त्याबाबत आपबिती कथन केली असता पोलीस गावकऱ्यांच्या पाठीशी आहेत ,दारूबंदी करण्यासाठी तातडीने कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आदर्शग्राम म्हणून परिचित असलेले सबगव्हान ग्रामपंचायतीने प्रजासत्ताक दिनी ८०टक्के महिलांच्या उपस्थितीत ग्रामसभेचे आयोजन केले.यावेळी गावात १०० टक्के दारूबंदी तसेच विक्रीचा ठराव एकमताने पारित करण्यात आला असून मारवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक व पीएसआय विनोद पाटील यांना दारुबंदीवरील कारवाईचे निवेदन ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिनी झालेल्या ग्रामसभेत पारित झालेल्या ठरावाची नक्कल देण्यात आली .

यावेळी सरपंच भारती पाटील ,उपसरपंच दगडू पाटील ,ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब पाटील ,विनायक पाटील , सखाराम पाटील , सुशिलाबाई पाटील ,उर्मिला पाटील ,मनीषा पाटील ,अल्का पाटील ,शोभाबाई पाटील , मंगलाबाई पाटील ,संगीता पाटील ,हिराबाई पाटील ,विठाबाई पाटील ,सुनंदा पाटील ,अनिता पाटील आदी महिला व युवक तसेच ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन देण्यात आले.

टीम झुंजार