पोषण आहारासाठी भाजीपाला पुरवठ्याचे बिल मंजूर करण्यासाठी मुख्याध्यापक व कार्यालय अधिक्षक १२ हजाराची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

Spread the love

गौरवकुमार पाटील | अमळनेर :- शालेय पोषण आहारासाठी भाजीपाला पुरवठ्याचे बिल मंजूर करण्यासाठी १२ हजाराची लाच स्विकारतांना शिंदखेडा तालुक्यातील आश्रम शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप कुमार वामनराव राठोड व कार्यालय अधिक्षक हनुक फुलसिंग भादले हे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. तक्रारदार यांच्या पत्नी महिला आदिवासी बचत गटाच्या सचिव आहेत. त्यांच्या बचत गटाने शासकीय प्राथमिक आश्रम शाळा म्हळसर, कॅम्प सुलवाडे तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे येथे शालेय पोषण आहारा करिता भाजीपाला पुरवठा करण्याचे कंत्राट घेतले असून तक्रारदार हे त्यांच्या पत्नीस मदत करत असतात.

सदर महिला बचत गटास वरील आश्रम शाळेकडून भाजीपाला पुरवठ्याचे मागील ९ महिन्याचे देयक मंजूर करून दिले होते. त्याचा मोबदला म्हणून तसेच उर्वरित २ महिन्याचे पुढील देयक अदा करण्यास मदत करण्यासाठी वरील मुख्याध्यापक व कार्यालय अधिक्षक यांनी तक्रारदार यांच्याकडून २० हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती १२ हजार रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य केले.

सदरची लाच रक्कम ही वरील दोघांनी पंचांसमक्ष स्वीकारल्याने त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांचे विरुद्ध शिंदखेडा पोलीस स्टेशन जिल्हा धुळे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तक्रारदार यांच्या पत्नी महिला आदिवासी बचत गटाच्या सचिव आहेत. त्यांच्या बचत गटाने शासकीय प्राथमिक आश्रम शाळा म्हळसर, कॅम्प सुलवाडे तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे येथे शालेय पोषण आहारा करिता भाजीपाला पुरवठा करण्याचे कंत्राट घेतले असून तक्रारदार हे त्यांच्या पत्नीस मदत करत असतात.

सदर महिला बचत गटास वरील आश्रम शाळेकडून भाजीपाला पुरवठ्याचे मागील 9 महिन्याचे देयक मंजूर करून दिले होते. त्याचा मोबदला म्हणून तसेच उर्वरित 2 महिन्याचे पुढील देयक अदा करण्यास मदत करण्यासाठी वरील आलोसे क्र 1 व आलोसे क्र 2 यांनी तक्रारदार यांच्याकडून 20,000/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 12,000/- रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य केले. सदरची लाच रक्कम ही वरील आलोसे क्र 2 यांनी पंचांसमक्ष स्वीकारल्याने त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांचे विरुद्ध शिंदखेडा पोलीस स्टेशन जिल्हा धुळे येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार