पतीला सोडून,तीन वर्षांपासून प्रियकरा सोबत राहत होती, अचानक नवरा आला भेटायला अन् पुढे जे घडलं ते धक्कादायक!

Spread the love

मुंबई :- एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका तरुणाने प्रेयसीची हत्या केली. तरूणाच्या मैत्रिणीचे आधीच लग्न झाले असले तरी ती गेल्या तीन वर्षांपासून त्याच्यासोबत राहत होती. दरम्यान, एके दिवशी अचानक महिलेचा नवरा तिला भेटायला आला.हा प्रकार प्रियकराला समजताच त्याने महिलेवर चाकूने वार केले. यानंतर आरोपी प्रियकरानेच आत्महत्येचा प्रयत्न केला. याबाबत माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला आहे.

आरोपी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तरुणाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.तीन वर्षांपूर्वी मीनाबाई त्यांचे पती काशिनाथ गिरी (४३) यांच्यासोबत मुंबईत राहत होत्या. मीनाबाईंचे पती काशिनाथसोबतचे संबंध चांगले नव्हते. दोघांमध्ये वारंवार भांडणे होत होती. यावेळी मीनाबाईंची भेट ३५ वर्षीय बाबुराव मोरे यांच्याशी झाली. दोघांमध्ये संवाद सुरू झाला आणि नंतर मैत्री झाली. काही वेळातच त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. मीनाबाईं प्रेमापोटी घर सोडायला तयार झाली,

त्यानंतर बाबुरावांच्या सांगण्यावरून मीनाबाईंनी पतीचे घर सोडले. मीनाबाई आणि बाबूराव मालाडच्या क्रांतीनगरमध्ये राहायला आले. मीनाबाई घरीच राहिल्या आणि बाबुराव आपल्या कामाला जाऊ लागले. मीनाबाईंचा पहिला पती काशिनाथ हा देखील 3 वर्षांपासून पत्नीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होता, त्यामुळे नुकताच त्यांना मीनाबाईचा पत्ता लागला. काशिनाथला मीनाबाईचा पत्ता कळताच त्याने तिचे क्रांतीनगर येथील घर गाठले.यावेळी बाबूराव नेहमीप्रमाणे कामावर गेले होते. पण बाबुराव काही कामावरुन घरी परतले तेव्हा त्यांना मीनाबाई त्यांचा पहिला पती काशिनाथ यांच्यासोबत असल्याचे पाहिले.

बाबुरावांना हे सहन झाले नाही. बाबुराव यांनी चाकू उचलून मीनाबाई यांच्यावर अनेक वार केले. दरम्यान, बाबूराव यांनीही याच चाकूने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि दोघांनाही शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यादरम्यान मीनाबाई यांचा मृत्यू झाला. तर बाबूराव यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. बाबुराव यांच्यावर पोलिसांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार