ट्रामा सेंटर मध्ये संतप्त नातेवाईकांना पोलिसांच्या समजुत नंतर मृतदेह घेतला ताब्यात.
यावल : अंजाळे जवळील मोर नदीच्या पुलावर गुरूवारी सांयकाळी एका कार चालकाने दारूच्या नशेत दोन दुचाकीला धडक दिली होती. या धडकेत एका दुचाकीवर मागे बसलेला १४ वर्षीय बालक हा थेट पुलावरून नदीपात्रात कोसळला होता व गंभीर जखमी झाला होता. या बालकाचा शुक्रवारी मध्यरात्री उपचारा दरम्यान मृत्यू झाला असुन शनीवारी भुसावळ येथील ट्रामा सेंटर मध्ये अंजाळे येथील नागरीकांनी गर्दी केली व जो पर्यंत कार चालक व कारमध्ये दारू पित असलेल्या सर्वांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भुमीका घेतली आहे.
डि वाय एस पी व पोलिस निरिक्षकांनी समजुत काढल्यानंतर मृतदेह नातलगांना सोपवण्यात आला.
अंजाळे ता. यावल येथील मोर नदी वरील पुलावर गुरूवारी सांयकाळी कार क्रमांक एम.एच. १९ बी.यु. ३०८५ वरील चालक श्रीराम सुरेश सोनवणे रा.यावल यांनी भुसावळ कडून भरधाव वेगात येतांना दोन दुचाकींना धडक दिली होती. या अपघातात अरविंद प्रभाकर पाटील वय ४५ रा. बोरावल खुर्द, देवेंद्र रामभाऊ शेकोगार व त्यांचा मुलगा गुणवंत उर्फ ओम देवंद्र शेकोगार वय १४ दोघं रा.अंजाळे हे गंभीर जखमी झाले होते.
विशेष म्हणजे अपघात इतका भिषण होता की १४ वर्षीय गुणवंत हा दुचाकीला धडक बसताचं थेट पुलावरून नदीपात्रात कोसळत गंभीर जखमी झाला होता. तर भुसावळ येथील ट्रामा सेंटर मध्ये उपचारा दरम्यान शुक्रवारी मध्यरात्री त्याचा मृत्यु झाला शनीवारी सकाळी त्यांच्या मृत्यूची बातमी अंजाळे गावात येेताचं नागरीकांनी भुसावळ येथील ट्रामा सेंटर मध्ये गर्दी केली.व जो पर्यंत दारूच्या नशेत असलेला कार चालक आणी त्याच्या सोबत असलेल्या इतर सर्वांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल होत नाही
तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भुमीका मयताच्या कुटुंबीयांनी घेतली व भुसावळ ट्रामा सेंटर मध्ये गर्दी केली येथे फैजपूर डीवायएसपी अन्नपुर्णा सिंग, पोलिस निरिक्षक राकेश मानगावकर यांनी जावुन मयताच्या नातेवाईक व जमावाची समजुत काढली तब्बल तीन तासानंतर जमाव शांत झाला व मयत बालकांवर शोकाकुल वातावरणात अंजाळे येथे अंतसंस्कार करण्यात आले.
हे पण वाचा
- आजचे राशी भविष्य रविवार दि. २४ नोहेंबर २०२४
- जळगाव ग्रामीण मतदार संघातून शिवसेना महायुतीचे गुलाबराव पाटील यांच्या दणदणीत विजय.
- एरंडोल विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमोलदादा पाटील यांचा एकतर्फी विजय,५६ हजार ३३२ मतांनी दणदणीत विजय.
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन