Viral Video: मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यातून एक मजेशीर व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये एक सरकारी शाळेतील शिक्षिका डान्सर सपना चौधरीच्या ‘आंख्य का यो काजल’ या गाण्यावर वर्गात जोरदार नाचताना दिसत आहे. शिक्षिकेच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.वास्तविक, हा व्हिडिओ जिल्ह्यातील बडोखर गावातील सरकारी शाळेतील आहे.
२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रसिद्ध नृत्यांगना सपना चौधरीच्या गाण्यांवर जोरदार नृत्य झाले. अशात शाळेतील शिक्षिकाही स्वत:ला नाचण्यापासून रोखू शकली नाही, ‘आंख्य का यो काजल’ हे गाणे वाजताच तिने जोमाने नाचण्यास सुरुवात केली. हे पाहून वर्गात उपस्थित मुलांनीही टाळ्या वाजवल्या. महिला शिक्षिकेचा व्हिडीओ सोशल मीडियावर येताच तो झपाट्याने व्हायरल झाला.
७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाची सध्या संपूर्ण देशभरात चर्चा होत आहे. वास्तविक, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता शाळा व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित झाले आहेत.या डान्स व्हिडिओवर लोकांची मतेही समोर आली आहेत. नृत्य खूप चांगले आहे, असे पालक म्हणत आहेत, मात्र शाळेत अभ्यासाच्या नावाखाली हे प्रकार सुरू आहेत. शिक्षणाच्या पवित्र मंदिरात एखाद्या शिक्षिकेने मुलांसमोर अशा गाण्यांवर नाचणे कितपत योग्य आहे?
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात जिल्हा शिक्षणाधिकारी एस.बी.सिंह यांनी एक व्हिडिओ व्हायरल होत असून, हा व्हिडिओ बारोखर गावातील सरकारी शाळेचा असल्याचे सांगितले.सध्या विभागाकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तपासात हे सत्य आढळून आल्यास पुढील कारवाई केली जाईल, असे शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले.
हे पण वाचा
- प्रेम संबंधांत अडसर ठरणाऱ्या नवऱ्याला प्रियकराच्या मदतीने दारू पाजली,अन् स्वत:च्याच हाताने कपाळाचं कुंकू पुसलं.
- तिसऱ्यांदा मुलगी झाल्याचा राग आला म्हणून नराधम पतीने पत्नीला पेट्रोल टाकून पेटवले, पेटलेल्या अवस्थेत धावली रस्त्यावर पण……
- मैं तेरे प्यार में पागल! ६ मुलांची आई पडली भिकाऱ्याच्या प्रेमात, घरातून रोख रक्कम घेवून भिकाऱ्यासोबत पळाली; पतीची पोलिसात तक्रार दाखल.
- Video:पत्रिका छापल्या, मंडप सजला नवरी म्हणाली, ‘माझं दुसऱ्यावर प्रेम आहे’, बापानं अन् भावानं गावासमोरच लेकीवर धाडधाड गोळ्या घातल्या ठार केल.
- Viral Video: लग्नादरम्यान अचानक वराचा मित्र स्टेजवर पोहोचला, वराच्या कानात कुजबुजला अन् क्षणार्धात मोडलं लग्न; पहा धक्कादायक व्हिडिओ.