उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा मंजूर होताच समाजकंटकांचा हैदोस,अनधिकृत मदरसा पाडल्यावर दगडफेक, जाळपोळ,4 ठार,100 जखमी

Spread the love

हल्दवानी : उत्तराखंड राज्यात UCC अर्थात समान नागरी कायदा मंजूर झाल्याबरोबर समाजकंटकांनी हैदोस घालायला सुरुवात केली. हल्दवानी मध्ये बनफूल पुरा भागात बेकायदा मदरसा आणि मशिदीवर प्रशासनाचा हातोडा पडताच समाजकंटकांनी उत्पात माजवत जाळपोळ करून हिंसाचार केला. या दंगलीमध्ये 4 जणांचा मृत्यू झाला असून 50 पोलिसांसह अन्य 100 जण जखमी झाले आहेत. हल्दवानीमध्ये सरकारने ताबडतोब ॲक्शन मोडमध्ये येऊन कर्फ्यू लागू करून समाजकंटकांच्या मुसक्या आवळ्याला सुरुवात केली आहे.उत्तरखंडातील हल्दवानी येथील वनभुलपुरा येथील मलिक यांच्या बागेत बांधलेली बेकायदेशीर मशीद तसेच मदरसा पाडण्यासाठी गेलेल्या प्रशासन आणि पोलिसांवर तसेच प्रसारमाध्यमांवर गुरुवारी सायंकाळी मुस्लिम जमावाने हल्ला केला. या हल्ल्यात चौघांचा मृत्यू झाला, तर 100 हून अधिक पोलीस जखमी झाले.

हल्द्वानीमध्ये इंटरनेट सेवा बंद आहे. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात पोलीस सतर्क झाले आहेत.

संपूर्ण राज्यात पोलीस सतर्क

देहरादून, हरिद्वार आणि उधम सिंह नगर जिल्ह्यात पोलीस पूर्ण सतर्क आहेत. सर्व पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना संवेदनशील भागांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. डेहराडून एसएसपीनेही शहरभर हालचाली वाढवल्या आहेत. संवेदनशील भागांवर पोलिसांची सतत नजर ठेवून आहेत. उधमसिंगनगर एसपींनीही संपूर्ण जिल्ह्यात पोलिस बंदोबस्त वाढवला आहे. प्रत्येक कानाकोपऱ्यावर पोलिसांची नजर असून सर्वसामान्यांनी अफवांवर लक्ष देऊ नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्याकडून आढावा

हल्दवणीच्या घटनेनंतर ग्रामीण भागात अधिक सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व अधिकारी रस्त्यांवरील प्रत्येक कामावर लक्ष ठेवून आहेत. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी देखील या संपूर्ण प्रकरणावर अधिकाऱ्यांकडून क्षणोक्षणी अपडेट्स घेत आहेत. बनफुलपुरा येथील तणावाचे वातावरण पाहता प्रशासन आता डेहराडूनमध्येही सतर्क झाले आहे. डेहराडूनच्या डीएम सोनिका सिंह आणि एसएसपी अजय सिंह यांची संयुक्त टीम सातत्याने संवेदनशील भागांचा दौरा करत आहे.

जखमी स्थानिक रुग्णालयात दाखल

हल्द्वानीमध्ये हिंसाचार कसा पसरला?उत्तराखंडात भाजप सरकारनेUCC अर्थात समान नागरी कायदा लागू केला यामुळे समाजकंटकांमध्ये संताप होताच बेकायदा मदरसा आणि मशीद पाडण्याच्या निमित्ताने तो संताप उफाळून येऊन समाजकंटकांनी हिंसाचार केला.उत्तराखंड हल्द्वानीच्या बनभूलपुरा भागात मलिकच्या बागेत बेकायदा मदरसा आणि मशीद होती. महापालिका आयुक्त पंकज उपाध्याय यांनी सांगितले की, या जागेजवळ तीन एकर जागा होती, जी यापूर्वीच महापालिकेने ताब्यात घेतली होती. यानंतर अवैध मदरसा आणि मशीद सील केली. नंतर मदरसा आणि मशीद दोन्ही बुलडोझरने उद्ध्वस्त केले. मदरसा पाडताच समाजकंटकांनी हिंसाचार सुरू केला. एसएसपी प्रल्हाद मीनी यांनी सांगितले की, मदरसा आणि मशीद बेकायदेशीरपणे अतिक्रमण केलेल्या सरकारी जमिनीवर बांधण्यात आली होती. ही दोन्ही ठिकाणे पाडण्यापूर्वी न्यायालयाच्या आदेशानंतर मोठ्या प्रमाणात पोलीस आणि पीएसी तैनात करण्यात आले होते. मात्र, पोलीस आणि पीएससी हजर असतानाही परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि दगडफेक सुरू झाली. पण उत्तराखंड सरकार पूर्ण सतर्क असून पोलीस देखील ॲक्शन मोड मध्ये आहेत. सीसीटीव्ही फुटेज तपासून समाजकंटकांवरच्या कारवाईला वेग आला आहे.

टीम झुंजार