नाशिक : नात्यातल्याच पीडित युवतीला फिरण्याच्या बहाण्याने रिसोर्टवर नेले आणि दारू पाजून तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार घडला आहे.पीडितेचे अश्लिल फोटो, व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत पुन्हा तिच्यावर बलात्कार करणाऱ्या संशयिताविरोधात मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.३२ वर्षीय दळवी नामक संशयिताविरोधात दिलेल्या पीडितेच्या फिर्यादीनुसार, संशयिताचे स्टील रिटेलिंगचा व्यवसाय असून, संशयिताची मावस मेहुणी असलेली पीडिता त्याच्याच कार्यालयात नोकरीला होती.
जुलै २०२२ मध्ये संशयिताने तिला फिरण्याच्या बहाण्याने घोटी परिसरातील विवांत रिसोर्टवर नेले. त्याठिकाणी त्याने बळजबरीने तिला दारू पाजली. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर बलात्कार केला. त्यावेळी त्याने अश्लिल फोटो व व्हिडीओ काढले. त्याआधारे काही दिवसांनी तिला अश्लिल फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल केले
आणि मुंबई नाका परिसरातील एका हॉटेलमध्ये तिच्यावर पुन्हा बलात्कार केला.तसेच, त्याने तिच्या नातेवाईकांना शिवीगाळ व धमकी दिली. त्याचा छळ असह्य झाल्याने पीडित तरुणीने पोलीसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यता आला आहे.
हे पण वाचा
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
- शहापूर चोरीच्या घटनेतील आरोपी जामनेर पोलिसांनी शोधला ; – जामनेर पोलीसांची यशस्वी कामगिरी
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती






