Viral Video: एक व्यक्ती दारुच्या नशेत महामार्गाच्या भररस्त्यात घातला धिंगाणा; बाईक चालकालाही केली मारहाण,पहा व्हिडिओ

Spread the love

Viral Video: मद्यधुंद अवस्थेत एका व्यक्तीने महामार्गावर झोपण्याचा प्रताप केला आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. यावेळी त्याला बाजूला करण्यासाठी आलेल्या एका बाईक चालकाला देखील या व्यक्तीने मारहाण केली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत आपल्याला दिसते की, मद्यधुद अवस्थेत असणारा व्यक्ती रस्त्याच्या मधोमध झोपलेला आहे. या रस्त्यावरुन लहान वाहनांपासून मोठ्या वाहनांची ये-जा सतत सुरू आहे. या व्यक्तीच्या बाजूने मोठा ट्रक जातो तरी त्याला जराही भिती वाटत नाही.

काही वेळातच त्याच रस्त्यावरुन एक बाईक चालक जात असतो तसेच एक रुग्णवाहिकाही जात असते परंतू झोपलेल्या व्यक्तीमुळे त्यांना तिथून जाण्यास अडथळा येतो. त्यानंतर रस्त्यावर झोपलेल्या व्यक्तीला पाहून तो आपली बाईक थांबवून त्या व्यक्तीला बाजूला करण्याचा प्रयत्न करत असतो. बाईक चालक गाडीवरुन उतरल्यानंतर रस्त्यावर झोपलेला व्यक्ती उठतो आणि बाईक चालकास मारण्यास सुरूवात करतो. या हाणामारीमध्ये बाईक चालकास तो धरतो आणि धक्का मारतो पंरतू बाईक चालक बाजूने येणाऱ्या ट्रकच्या खाली जाण्यापासून थोडक्यात वाचतो आणि त्याची बाईकला पण धडकलून देतो. यानंतरही दोंघाची हाणामारी सुरू राहते.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील @gharkekalesh या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. याआधीही मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या व्यक्तीमुळे अनेक अपघात झालेल्या घटना समोर आल्या आहेत. संबंधित सर्व प्रकार रस्त्यावरील व्यक्ती आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रीया येत आहेत. व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये एका यूजरने कमेंट केली आहे की,’कौन है यह लोग’ तर दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की,’ट्रकच्या खाली जाता जाता वाचला’.व्हिडिओला हजारोच्या घरात व्हयूज मिळत असून मोठ्या प्रमाणात लाईक्स येत आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार