चोपडा प्रतिनिधी | डॉ सतीश भदाणे चोपडा:- तालुक्यात हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने 21 फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी 5 वाजता कोर्टाजवळील खान्देश प्रेस मैदान येथे ‘विराट हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सभेच्या आयोजकांनी हॉटेल श्रीनाथ प्राइड येथे आयोजित पत्रकार परिषदेत आयोजकांनी पत्रकारांना दिली.
छत्रपती शिवराय यांच्या जयंतीनिमित्त चोपडा येथे आयोजित सभेच्या ठिकाणी राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाच्या संदर्भात माहिती देणारे फलक, क्रांतीकारकांबद्दल माहिती देणारे फलक, यांसह हिंदूंना प्रतीदिन करावयाच्या धर्माचरणाच्या कृती, साधना यांविषयी मार्गदर्शन करणारे फलक प्रदर्शन लावण्यात येणार आहे.
हे वर्ष श्री शिवराज्या भिषेकचे 350 वे वर्ष आहे. या सभेसाठी तालुक्यातील 100 हून अधिक गावांमध्ये प्रसार करण्यात येत असून विविध तरुण मंडळे, महिलांचे गट, ग्रामस्थ, हिंदुत्वनिष्ठ यांच्या बैठका घेण्यात येत आहेत. भिंत्तीपत्रके, हस्तपत्रके, होर्डिंग, फलकलेखन, रिक्शा उद्घोषणा, सामाजिक संकेतस्थळ (सोशल मीडिया) यांच्या माध्यमातून व्यापक स्तरावर सभेचा प्रसार चालू आहे.या सभेत प्रमुख वक्ता म्हणून तेलंगणा येथील प्रखर हिंदुत्ववादी टायगर राजा सिंह यांची विशेष उपस्थिती चोपडा तालुक्यात लाभणार आहे, तसेच सनातन संस्थेचे सद्गुरू नंदकुमार जाधव, हिंदु जनजागृती समितीचे उत्तर महाराष्ट्र संघटक प्रशांत जुवेकर आणि रणरागिणी कु. प्रतीक्षा कोरगावकर हे त्या ठिकाणी संबोधित करतील.
अनिल वानखेडे, अमृत सचदेव, राजाराम पाटील, गजेंद्र जैस्वाल, नरेश पाटील, प्रवीण जैन, नरेश महाजन, मनीष गुजराथी, राजू स्वामी, यशवंत चौधरी, प्रशांत जुवेकर यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले अनेक युवक धर्मरक्षणाच्या कार्यात सहभागी व्हावे असे आव्हान करण्यात आले.व व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अमृत सदैव यांनी दुपारून चार वाजेनंतर 100% सर्व दुकाने बंद ठेवण्यात येथील असे देखील पत्रकारांना सांगितले आहे.
हे पण वाचा
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
- शहापूर चोरीच्या घटनेतील आरोपी जामनेर पोलिसांनी शोधला ; – जामनेर पोलीसांची यशस्वी कामगिरी
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती






