पतीचं ‘ते’ अघोरी कृत्याने लग्नाच्या सातव्याच दिवशी विवाहितेचा मृत्यू, नवऱ्याच्या राक्षसी कृत्याने सारेच हादरले.

Spread the love

हमीरपूर (उत्तरप्रदेश) :- लग्न म्हणजे दोन जीवांचं मीलन, अग्नीच्या साक्षीने सात जन्म सोबत राहाण्याचं घेतलेलं वचन, सुख-दु:खात एकमेकांना खंबीरपणे दिलेली साथ. लग्नानंतर आयुष्याची नव्याने सुरुवात होते.

नव्या आयुष्याची सुरुवात होते. पण या नात्यात केवळ शारीरिक संबंधांना प्राथमिकता दिली गेली तर हे एका क्षणात उद्ध्वस्त होऊन जातं. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सुखी संसाराची स्वप्न पाहणाऱ्या एका विवाहितेचा लग्नाच्या सातव्याच दिवशी मृत्यू झाला. तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरलं ते पतीचं अघोरी कृत्य.

पतीचं अघोरी कृत्य
मुलीच्या मृत्यूची बातमी कळताच तिच्या कुटुंबाला धक्का बसला. याप्रकरणी कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरु केल्यानंतर विवाहितेच्या मृत्यूचं धक्कादायक कारण समोर आलं. त्या विवाहितेचा पती शक्तिवर्धक गोळ्या खाऊन पत्नीबरोबर नैसर्गिक आणि अनैसर्गिक संबंध प्रस्तापित करत होता. यामुळे पत्नी जखमी झाली आणि अतिरक्तस्त्राव झाला. उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. उत्तरप्रदेशमधल्या हमीरपूर जिल्ह्यातील ही घटना आहे.

सात दिवसांपूर्वी झालं होतं लग्न

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याच वर्षी 4 फेब्रुवारीला या तरुणीचा विवाह एका सॉप्टवेअर इंजिनिअरशी झाला. मुलीला आईवडिल नाहीत. पण तिचा मोठा भाऊ आणि वहिणीने तिचा लाडात तिचा सांभाळ केला. एकुलत्या एका बहिणीचं लग्न मोठ्या धुमधडाक्यात करण्यात आलं. नव्या आयुष्याची स्वप्न घेऊन ती पतीच्या घरी गेली. पण आठवडाभरातच बहिणीच्या मृत्यूची बातमी आल्याचं मृत तरुणीच्या भावाने सांगितलं. लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच पतीने शक्तीवर्धक गोळ्या खात शारीरिक संबंध प्रस्तापित केले. यामुळे तिची प्रकृती ढासळली.

सासरच्यांचा खोटा आरोप
तरुणीची तब्येत ढासळल्यानंतर मुलाच्या आई-वडिलांनी तरुणीच्या भावाला फोन करुन तुम्ही आमची फसवणूक केल्याचं सांगितलं. ती आजारी असते आणि ही गोष्ट आमच्यापासून लपवल्याचा आरोप सासरच्यांनी केला. पण मुलीला कोणताही आजार नसल्याचं तिच्या माहेरच्यांनी सांगितलं. मुलीच्या वहिणीने तिच्या सासरी जाऊन भेट घेतली असता तीने पती शक्तीवर्धक गोळ्या घेऊन संबंध ठेवत असल्याचं सांगितलं.

गायनोकॉलिजिस्टचा धक्कादायक रिपोर्ट
उपचार करणारी गायनोकॉलिस्टही तरुणीची अवस्था पाहून हादरली. सामुहिक बलात्कार केल्याप्रमाणे या तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याचं डॉक्टरने सांगितलं. तरुणीवर विरोध केल्यावर तिला मारहाण करुन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी मृत तरुणीच्या भावाने पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार