यावल:- स्वावलंबन योजनेचा निधी मंजूर झाल्यानंतर त्या पोटी बक्षीस म्हणून एक लाख रुपये लाच मागितल्यानंतर लाच रक्कम स्वीकारल्याप्रकरणी चुंचाळे ग्रामपंचायतीचा ऑपरेटर सुधाकर धुडकू कोळी (35, चुंचाळे) यास जळगाव एसीबीने अटक केली तर चुंचाळे ग्रामसेवक हेमंत कमलाकर जोशी (चुंचाळे) हा पसार झाला आहे. हा सापळा शनिवार, 17 रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास यशस्वी करण्यात आला.
असे आहे लाच प्रकरणचुंचाळे येथील 46 वर्षीय तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, चुंचाळे, ता.यावल गावी त्यांच्या वडिलांच्या नावाची संस्था असून त्यामध्ये 15 वित्त आयोगाच्या शिफारशीतून गावात शिलाई मशीन प्रशिक्षण देवून ग्रामीण भागातील महिला व युवतीना स्वावलंबी करण्यासाबाबत केंद्र शासनाकडून दोन लाख रुपये निधी मंजूर झाला होता. मंजूर निधीतून तब्बल 50 टक्के बक्षीस म्हणून एक लाखांची लाच ग्रामसेवक हेमंत जोशी यांनी शुक्रवार, 16 रोजी मागितली होती. तक्रारदाराने याबाबत शुक्रवारी जळगावी तक्रार नोंदवल्यानंतर लाचेची पडताळणी करण्यात आली.
ग्रामसेवक पसार तर ऑपरेटर जाळ्यात शनिवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचल्यानंतर ग्रामसेवकाने लाचेची रक्कम ऑपरेटर यांच्याकडे देण्यास तक्रारदाराला सांगितल्यानंतर ऑपरेटर सुधाकर कोळी यांनी लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली तर ग्रामसेवक हेमंत जोशी यांना सापळ्याबाबत कुणकुण लागताच ते पसार झाले. दोघांविरोधात यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.यांनी केला सापळा यशस्वीहा सापळा जळगाव पोलिस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे, पोलिस निरीक्षक एन.एन.जाधव, एएसआय दिनेशसिंग पाटील, नाईक बाळू मराठे, नाईक सुनील वानखेडे, एएसआय सुरेश पाटील, हवालदार रवींद्र घुगे, महिला हवालदार शैला धनगर, किशोर महाजन, प्रदीप पोळ, प्रणेश ठाकुर, अमोल सूर्यवंशी आदींच्या पथकाने यशस्वी केला.
हे पण वाचा
- आजचे राशी भविष्य रविवार दि. २४ नोहेंबर २०२४
- जळगाव ग्रामीण मतदार संघातून शिवसेना महायुतीचे गुलाबराव पाटील यांच्या दणदणीत विजय.
- एरंडोल विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमोलदादा पाटील यांचा एकतर्फी विजय,५६ हजार ३३२ मतांनी दणदणीत विजय.
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन