जळगाव :- विविध आमिष दाखवून नागरिकांना गंडविले जात असल्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत असून असाच एक प्रकार जळगावातून समोर आला आहे. भिशीसाठी रक्कम गोळा करण्यासह पैसे वाढवून देण्याचे आमिष दाखवून कोल्हे हिल्स परिसरातील योजना नगरातील एका दांपत्याने १३ महिलांची तब्बल ५५ लाख २२ हजार २८० रुपयांत फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पल्लवी विजय ठोसर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सविता संजय सोळखे व तिचा पती संजय धोंडू सोळंखे या दांपत्याविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पल्लवी विजय ठोसर या योजनानगर येथे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. दीड वर्षापूर्वी त्यांच्याच भागातील सविता व तिचा पती संजय सोळंखे यांच्याशी ओळख झाली होती, सप्टेंबर महिन्यात त्यांनी पैसे वाढवून देण्याचे आमिष दाखवुन ठोसर यांच्याकडून ५० हजार रुपये घेतले, नंतर हळूहळ रक्कम देऊन ठोसर यांचा विश्वास संपादन केला,
तसेच योजनानगरमध्ये महिलांकडून दर महिन्याला खासगी भिशीच्या नावाने सविता ही महिलांकडून रक्कम गोळा करत असल्याची माहितीही ठोसर यांना मिळाली होती. नंतर सविता हिने काही महिलांच्या नावावर वैयक्तिक कर्जही काढून ती रक्कम घेऊन घेतली होती. वेळोवेळी सविता व तिच्या पतीने ठोसर यांच्याकडून जादा पैसे परत करण्याचे आमिष दाखवून १३ लाख ४६ हजार २०० रुपये घेतले. याशिवाय काही महिलांकडून ४१ लाख ७६ हजार ८० रुपये एवढी रक्कम घेतली.
दरम्यान, ठोसर यांनी सविता हिला पैसे परत करण्यास सांगितले. मात्र, तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर ठोसर यांनी महिलेच्या घरी चकरा मारल्या; परंतु ती मिळून आली नाही. अखेर आपली व इतर महिलांची फसवणूक झाल्याची बाब लक्षात आल्यावर ठोसर यांनी तालुका पोलिस ठाण्यात येऊन संपूर्ण घटना सांगितली. त्यानुसार सविता सोळंखे व तिचा पती संजय सोळंखे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अनंत अहिरे करीत आहेत.
हे पण वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






