मरिमाता चौक मित्र मंडळ आणि दाभाडे परिवारातर्फे वाढदिवसानिमित्त अँड किशोर काळकर यांचा नागरी सत्कार. सर्वपक्षीय पदाधिका-यांची उपस्थिती.

Spread the love

झुंजार प्रतिनिधी । एरंडोल

एरंडोल:--येथील मरिमाता चौक मित्र मंडळ,सामाजिक कार्यकर्ते आनंद दाभाडे,माजी उपनगराध्यक्षा छाया दाभाडे आणि मित्र परिवारातर्फे भाजपचे जनजातीय क्षेत्राचे प्रदेश प्रमुख advt.किशोर काळकर यांचा वाढदिवसानिमित्त नागरी सत्कार करण्यात आला.नगराध्यक्ष रमेश परदेशी अध्यक्षस्थानी होते.कार्यक्रमास सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.अँड.किशोर काळकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपने पालिका निवडणुकीची पूर्वतयारी सुरु केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

भाजपचे जनजातीय क्षेत्राचे प्रमुख अँड.किशोर काळकर मागील आठ वर्षांपासून आपला वाढदिवस साजरा करीत नव्हते,मात्र यावर्षी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहाने अँड.काळकर यांनी वाढदिवस साजरा केला.यावेलिअद्व्त.किशोर काळकर यांनी शहरात राजकीय क्षेत्रात वाड नसल्यामुळे विकासाची कामे वेगाने होत असल्याचे सांगितले.आगामी काळात होणा-या पालिका निवडणुकीत शहराच्या विकासासाठी प्रयत्न करणा-या उमेदवारांना मतदारांनी संधी द्यावी असे आवाहन केले.शहरातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांचे पदाधिकारी निवडणूक झाली की राजकीय मतभेद बाजूला सारून एकत्र येत असल्याचे सांगितले.केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष आपलाच होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.पालिका निवडणुकीत राजकीय समीकरणे कशी असतील याबाबत त्यांनी सर्वांनाच संभ्रमात टाकले.नगराध्यक्ष रमेश परदेशी यांनी पाच वर्षात अँड.किशोर काळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेने विकासाची कामे अनेक कामे पूर्ण केल्याचे सांगितले.

युवासेनेचे शहर प्रमुख अतुल महाजन यांनी शहरात पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली असताना.अँड किशोर काळकर यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून पंधरा दिवसात लमांजन पाणी पुरवठा योजना मंजूर करून शहरातील पाण्याची समस्या कायमस्वरूपी दूर केल्याचे सांगितले.यावेळी उद्योजक संजय जाधव,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा.मनोज पाटील,भाजप ओ.बी.सी.मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय महाजन,भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष कपिल पाटील,माजी नगराध्यक्ष रवींद्र महाजन,जयश्री पाटील,नगरसेविका आनद दाभाडे,नगरसेवक डॉ.नरेंद्र ठाकूर यांनी मनोगत व्यक्त केले.अँड.काळकर यांची वाढदिवसानिमित्त वाजतगाजत आणि फटाक्यांची आतषबाजी करत मिरवणूक काढण्यात आली.माजी नगरसेवक डॉ.नरेंद्र पाटील यांनी सुत्रसंचलन केले.कार्यक्रमास भाजप उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष सचिन विसपुते,माजी नगरसेवक नितीन महाजन,सुनील पाटील,कॉंग्रेसचे नगरसेवक योगेश महाजन,प्रभाकर पाटील,गुजर समाजाचे अध्यक्ष गोपाल गुजर,माजी उपनगराध्यक्ष अशोक चौधरी,तेली समाजाचे अध्यक्ष गुलाब चौधरी,प्रमोद महाजन,आबा चौधरी,सुरेश दाभाडे,अमोल तांबोळी यांचेसह सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

वरील बातमीच्या व्हिडीओ पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा https://youtu.be/w2o7_M9Rq5E

 

टीम झुंजार