भुसावळ:- सध्या बारावीचे पेपर सुरू आहेत. दरम्यान बारावीच्या निकालानंतर अपेक्षित यश न मिळाल्याने विद्यार्थी टोकाचे पाऊल उचलत असतात. मात्र भुसावळ शहरातील समृद्धी पार्क येथे राहणाऱ्या बारावीतील विद्यार्थ्याने इंग्रजीचा पेपर अवघड गेल्याने नैराश्यातून घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. भुसावळ शहरातील समृद्धी पार्क येथे वास्तव्यास असलेला इदांत पंकज मंडलेचा (वय १७) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे.
यंदा बारावीच्या वर्गात शिक्षण घेत असून काही दिवसांपासून बारावीची परीक्षा (HSC Exam) सुरू झाली. यामध्ये इदांत मंडलेचा याने काही दिवसांपूर्वी बारावीचा पहिलाच इंग्रजी विषयाचा पेपर दिला होता. परंतु हा पेपर त्याला अवघड गेल्याने तेव्हापासून तो नैराश्यात होता.
घरी कोणी नसताना घेतला गळफास
दरम्यान, २७ फेब्रुवारीला इदांत याने घरी कोणी नसताना पंख्याला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाइकांनी एकच आक्रोश केल्याचे पाहायला मिळाले. या घटनेबाबत रात्री भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस कर्मचारी गणेश चौधरी तपास करीत आहेत.
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम