रावेर पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्या एकास केले जेरबंद, 5 मोटारसायकलीं केल्यात जप्त.

Spread the love

रावेर :- पोलिसांनी एका मोटरसायकल चोराला अटक करून त्याच्याकडून पाच विविध कंपन्यांच्या मोटारसायकली ताब्यात घेतल्या आहेत. पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर रुजू झाल्यापासून अवैध जनावरांची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईची संक्रांत सुरू आहे. त्यानंतर मोटरसायकल चोरीचा गुन्हा रावेर पोलिसांनी उघडकीस आणला आहे.पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संशयित अजय वाघोरे (वय २७, रा. भोर रेल्वेस्टेशन, रावेर) याने एक फॅशन प्रो कंपनीची (एमएच १९, बीआर ५२६९) ही मोटरसायकल चोरून आणलेली आहे.

पोलिसांनी चौकशीअंती त्याच्याकडून सात हजार रुपये किमतीची एक काळ्या रंगाची फॅशन प्रो कंपनीची मोटारसायकल (एमएच १९, बीआर ५२६९) ३५ हजार रुपये किमतीची एक होंडा शाईन मोटारसायकल (एमएच २८, एएक्स २५०५), तर २२ हजार रुपये किमतीची एचएफ डिलेक्स कंपनीची विना नंबर.३६ हजार रुपये किमतीची एक होंडा शाईन विना नंबर, २८ हजार रुपये किमतीचे एक फॅशन प्रो विना नंबर मोटार सायकली अशा एकूण पाच मोटार सायकली रावेर पोलिस प्रशासनाने जप्त केल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

यांनी केली कारवाई

पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलिस अधीक्षक (फैजपूर) अन्नपूर्णा सिंग, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी ईश्वर चव्हाण. सुरेश मेढे, समाधान ठाकूर, सचिन घुगे, प्रमोद पाटील, विशाल पाटील, महेश मोगरे, अमोल जाधव, सुकेश तडवी, तथागत सपकाळे, विकार शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार