फरकांडे ग्रा.प.सदस्य अतिक्रमन चौकशी अहवाल देण्यास विस्तार अधिकार्यांकडून टाळाटाळ
फरकांडे तालुका एरंडोल (विशेष प्रतिनिधी ) येथील ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य रवींद्र मन्साराम पाटील व कविता संजय पाटील यांनी सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी ग्रा प सदस्य पदावरून अपात्र करण्यात यावे अशी तक्रार 25 ऑगस्ट 2021 रोजी माजी सरपंच सुरेश पाटील व छगन बेहेरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात केल्याने याबाबत चौकशी करून अहवाल पाठवण्याचे पत्र 6 सप्टेंबर 2021रोजी जि प मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एरंडोल पंचायत समितीचे विस्तार अधिकारी रवींद्र सपकाळे यांना स्थानिक चौकशी करून अतिक्रमण बाबत अहवाल पाठविण्याचे आदेश केले होते.
मात्र संबंधित चौकशी अधिकारी सपकाळे हे या कामात विनाकारण दिरंगाई करीत असून अहवाल, अतिक्रमण धारकाकडून होण्यासाठी अर्जदारांना विश्वासात न घेता परस्पर अहवाल तयार केला जात आहे. पंचनामा न करता भेट देणे. अहवाल देण्यास हेतूपुरस्कार विलंब केला जात असून या प्रकरणात पैशांची देवाण-घेवाण झाल्याची दाट संशय आहे. याबाबतीत सखोल व निपक्षपातीपणे चौकशी होऊन तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश व्हावे, याबाबत दखल न घेतली गेल्यास जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
या बाबत थोडक्यात वृत्त असे की फरकांडे चे विद्यमान ग्रा पं सदस्य रवींद्र मन्साराम पाटील यांचे गट क्रमांक 23 भोगवटा सरकारी मिळकत 20 ×60 या एवढ्या जागेवर पक्क्या घराचे अतिक्रमित बांधकाम, व गट क्रमांक 22 गावठाण साठी राखीव झाल्यावर 100×50 चौ. फु. गुरांचा गोठा व पत्रे शेड बेकायदेशीर अतिक्रमण केले आहे. तर दुसरे ग्रा प सदस्य सौ कविता संजय पाटील यांनी त्यांचे सासरे कै.विनायक हिरामण पाटील आमचे नाव असलेल्या मा. क्र.4/8 राहत्या घरात लागून 8×15 एवढे अतिक्रमीत बांधकाम त्यांचे पती संजय विनायक पाटील यांनी गट क्रमांक 22 मध्ये100×100चौ. फु. गुरांचा गोठा व पत्रीशेड अतिक्रमण केले असून याबाबत चौकशी होऊन सदस्य पदावरून अपात्र करण्याची मागणी सहा महिन्यापूर्वी तक्रारदारांनी केली होती मात्र याबाबतीत जिल्हाधिकार्यांनी चौकशी अहवाल पाठविण्याचे पत्र पाठविनही एरंडोल पंचायत समितीचे विस्तार अधिकारी रवींद्र सपकाळे हे हेतूपुरस्कार दुर्लक्ष करत असून चौकशी अहवाल देण्यास टाळाटाळ करत असल्याचे तक्रारदार यांनी निवेदनात नमूद केले असून दखल न घेतली गेल्यास जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.