मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून नेमकं कोण विजयी होणार याबाबत आतापासूनच चर्चा झडू लागल्या आहेत. मागील पाच वर्षात महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं ही पूर्णपणे बदलून गेली आहेत. अशातच आता इंडिया टीव्ही- सीएनएक्सच्या ओपिनियन पोलमध्ये 48 मतदारसंघात नेमकं कोण जागा जिंकणार याबाबत अंदाज वर्तवण्यात आला आहे. सुरुवातीला शिवसेना (UBT) काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार हे तीन पक्ष म्हणजेच महाविकास आघाडी म्हणून राज्यात निवडणूक लढवणार आहेत. तर दुसरीकडे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे निवडणूक लढवणार आहेत. अशावेळी 48 जागांवर नेमका कोणाचा उमेदवार जिंकणार याबाबत सध्या बरीच चर्चा सुरू आहे. त्याचबाबत ओपिनियन पोलमध्ये अंदाज वर्तवण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील 48 मतदारसंघामध्ये कोण मारू शकतो बाजी?
•मुंबई उत्तर – भाजप. •मुंबई उत्तर पश्चिम – शिवसेना. •मुंबई उत्तर पूर्व – भाजप. •मुंबई उत्तर मध्य – भाजप. •मुंबई दक्षिण मध्य – शिवसेना. •मुंबई दक्षिण – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे). •नंदूरबार -भाजप. •धुळे – भाजप. •जळगाव -भाजप •दिंडोरी -भाजप •नाशिक -शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे). •बुलढाणा – शिवसेना. •अकोला – भाजप. •अमरावती – भाजप. •वर्धा – भाजप. •रामटेक – काँग्रेस. •नागपूर – भाजप. •भंडारा-गोंदिया – भाजप. •गडचिरोली चिमूर -भाजप. •चंद्रपूर – भाजप. •यवतमाळ वाशिम – शिवसेना. •हिंगोली – काँग्रेस. •नांदेड – भाजप •परभणी – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे). •जालना – भाजप. •छत्रपती संभाजीनगर – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे).
•धाराशिव – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे). •लातूर – भाजप. •बीड – भाजप. •पालघर – भाजप. •भिवंडी – भाजप. •कल्याण – शिवसेना •ठाणे – शिवसेना. •रायगड – राष्ट्रवादी काँग्रेस •मावळ – राष्ट्रवादी काँग्रेस. •रत्नागिरी-सिंधुदुर्ग – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) •पुणे – भाजप •बारामती – राष्ट्रवादी काँग्रेस •शिरूर – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार •अहमदनगर – भाजप. •शिर्डी – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे). •सोलापूर – भाजप •माढा – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार •सांगली – भाजप •सातारा – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार •कोल्हापूर – राष्ट्रवादी काँग्रेस •हातकणंगले -शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे).
India TV-CNX च्या ओपिनियन पोलनुसार, महाविकास आघाडीला राज्यात 48 पैकी केवळ 13 जागाच मिळू शकतील. ज्यामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 8 जागा जिंकू शकते, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस 3 जागा आणि काँग्रेसला 2 जागांवरच विजय मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
अमित शाहांनी शिंदे-अजित पवारांना काय दिलाय फॉर्म्युला?
अमित शाहा हे मागील दोन दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. जिथे अमित शाहांनी महाराष्ट्रातील जागांसाठी एक फॉर्म्युला दिला आहे. ज्यामध्ये भाजपला 32, शिवसेनेला 10 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 6 जागा देण्यात येतील. अधिकाधिक उमेदवार हे भाजपच्या कमळ या चिन्हावर निवडून यावेत यासाठी अमित शाह यांचे प्रयत्न आहेत आणि त्यामुळेच अशाप्रकारचा फॉर्म्युला हा शिंदे-पवारांना देण्यात आल्याचं सूत्रांकडून समजतं आहे.