जळगाव : व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार केला. एवढेच नव्हे तर कागदावर स्वाक्षरीसह दागिने देण्यास नकार दिल्याने महिलेला जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीला अटक केलीय.
जळगाव शहरातील एका परिसरात पीडित महिला वास्तव्यास आहे. त्यांची भुषण निलेश पाटील (रा. खेडी, ता. जळगाव) याच्यासोबत ओळख झाली. दरम्यान, भुषण पाटील याने महिलेशी जवळीक साधून, शहरातील विविध ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. अत्याचाराचा व्हिडिओ तयार करुन तो व्हायरल करण्याची धमकी देत भुषण पाटील याने महिलेेकडून सुमारे तीन ते चार लाखांचे दागिने घेतले.तसेच महिलेला कोऱ्या कागदावर स्वाक्षरी करण्यास सांगितले.
महिलेने स्वाक्षरी करण्यास नकार दिल्याने भुषण पाटील याने पीडितेला मारहाण करुन जीवेठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पीडित महिलेने एमआयडीसी पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार भुषण निलेश पाटील याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमारे हे करीत आहे.
हे पण वाचा
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती
- एरंडोल येथे तालुका व शहर काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न.
- होय एरंडोलच : अखेर ॲड. आकाश महाजन यांचा प्रयत्नांना यश.
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.