परराज्यातील तरुणींकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय, छापेमारीत दोन तरुणींची सुटका

Spread the love

पुणे : पुण्यातील (Pune) आंबेगाव परिसरात सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आला असून वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या दोन तरुणींची सुटका करण्यात आली आहे. तर दोघांना अटक पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. विपुल बाबासाहेब बेलदरे (36, आंबेगाव) आणि विक्रम करण शोनार (24, रा. ब्रम्हा लॉज, आंबेगाव) असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी हॉटेल मालकासह त्याच्या अन्य तीन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. पीडित तरुणी ह्या मूळच्या उत्तर प्रदेशातील रहिवासी असून त्यांना नोकरीच्या बहाण्याने पुण्यात आणण्यात आलं होतं.
संबंधित आरोपी मागील बऱ्याच दिवसांपासून पुणे-मुंबई महामार्गावरील ब्रम्हा लॉजवर सेक्स रॅकेट चालवत होते. परराज्यातील तरुणींकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतला जात होता.

याबाबत अधिक माहिती देताना भारती विद्यापीठ पोलिसांनी सांगितलं की, पुण्याच्या आंबेगाव परिसरातील ब्रम्हा पॅलेस लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून सेक्स रॅकेटबाबत पाठपुरावा केला. खात्री पटल्यानंतर पोलीस पथकाकडून ब्रम्हा पॅलेस लॉजवर पोलिसांनी छापेमारी केली आहे. यावेळी पोलिसांनी दोन दलालांना अटक केली असून दोन तरुणींची सुटका केली आहे.

टीम झुंजार