जळगाव,(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघांचे राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशन दिनांक १६ मार्च २०२४ रोजी पुण्यातील VIP बँक्वेट हॉल, वाल्हेकर वाडी, चिंचवड येथे सकाळी १०.०० ते सायंकाळी ७.०० वाजे दरम्यान पत्रकार संघांचे अध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली होत असून अधिवेशनास उत्तर महाराष्ट्र विभागातील पत्रकार बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने या वर्षीचे राज्यस्तरीय अधिवेशन पिंपरी चिंचवड, पुणे येथे घेण्यात येत आहे. या अधिवेशनात ‘सध्याची राजकीय सामाजिक परस्थिती’ यावर परिसंवादाच्या माध्यमातून विचार मंथन होणार आहे. तसेच राज्यातील सर्वोत्कृष्ट पत्रकारांचा सन्मान करून त्यांना अधिक काम करण्यासाठी प्रेरणा मिळावी यासाठी प्रयत्न होणार आहे. शनिवार, दिनांक १६ मार्च २०२४ रोजी आहेर VIP बँक्वेट हॉल, वाल्हेकर वाडी, चिंचवड येथे सकाळी १०.०० ते सायंकाळी ७.०० वाजेपर्यंत होणाऱ्या या अधिवेशनात सकाळी उद्घाटन सोहळा, दुपारी परिसंवाद व भोजन आणि सायंकाळी ४ वाजता विशेष पुरस्कार सोहळा होणार आहे.
तरी उत्तर महाराष्ट्र विभागातील जिल्हाध्यक्ष,ग्रामीण जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष,महानगर, शहर अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य यांनी मोठ्या संख्येने अधिवेशनासाठी उपस्थित राहावे असे आवाहन राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे, राज्य प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे, खान्देश विभाग प्रमुख किशोर रायसाकडा यांनी केले आहे.
हे पण वाचा
- दुर्दैवी घटना! घरात विवाह सोहळ्याची जय्यत तयारी, एकुलत्या एक मुलाच्या हळदीच्या दिवशीच आईने घेतला जगाचा निरोप.
- एस.टी. बसमधून प्रवास करणार्या महिला प्रवाशाच्या अडीच लाखांच्या दागिन्यांवर एस.टी.चालकाचा डल्ला, पोलिसी खाक्यानंतर दिली कबुली.
- धक्कादायक! प्रियकराशी बोलताना अडीच वर्षांची चिमुकली व्यत्यय अन् त्रास द्यायची म्हणून संतापलेल्या आईने निष्पाप लेकीला टेरेसवरुन फेकलं अन्……
- भीषण अपघात! दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात शिवशाही बस उलटली 11 जणांचा मृत्यू,20 हून अधिक प्रवासी जखमी; मृतांना तातडीने 10 लाख रुपयांची मदत.
- Viral Video: दोन दरोडेखोर पिस्तुलाचा धाक दाखवून दागिने लुटणार इतक्यात दुकानदार व कर्मचाऱ्यांनी अस केलं की चोरांचा डाव उलटवला.