नवी मुंबई : अलिबागच्या निलंबित तहसीलदार मीनल दळवी यांच्याकडे उत्पन्नाच्या ९८ टक्के अधिक संपत्ती मिळून आली आहे. लाच मागितल्याप्रकरणी २०२२ मध्ये त्यांच्यावर कारवाई झाल्यानंतर त्यांच्या संपत्तीचा शोध सुरू होता. त्यामध्ये २ कोटी ६२ लाखांची त्यांची संपत्ती मिळून आली असून, बहुतांश संपत्ती त्यांच्या पतीच्या नावे केली होती. त्यांना ७ दिवसांची कोठडी दिली आहे.
नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागाने नोव्हेंबर २०२२ मध्ये दळवी यांच्यावर लाच घेताना कारवाई केली होती. तक्रारदार यांच्याकडे त्यांनी ५ लाखांची लाच मागून त्यापैकी २ लाख रुपये घेतले होते. त्यांच्या घराच्या झडतीत १ कोटी २ लाखांची रोकड, ६०० ग्रॅम सोन्याचे दागिने व काही मालमत्तांची माहिती हाती लागली होती.
५ घरे, १ भूखंड आणि एक गाळा –
मालमत्तेच्या अधिक चौकशीत मीनल दळवी यांची तब्बल २ कोटी ६२ लाखांची संपत्ती समोर आली आहे. त्यामध्ये घरातून जप्त केलेल्या ऐवजा सोबतच ५ घरे, १ भूखंड व १ व्यावसायिक गाळा अशी मालमत्ता उघड झाली आहे. ही सर्व संपत्ती पती कृष्णा दळवीच्या (वय ५५) नावे केलेली आहे. कृष्णा यांचा टुरिस्ट बुकिंगचा व्यवसाय होता; मात्र त्यातून कोणत्याही प्रकारे नफा नसताना दाखविण्यासाठी तो व्यवसाय चालवला जात होता.यावरून संपूर्ण संपत्ती ही तहसीलदार मीनल दळवी यांनी शासकीय नोकरीला लागल्यापासून कमावल्याचा ठपका लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ठेवला आहे. त्यानुसार पती-पत्नीवर गुन्हा दाखल केला आहे.
हे पण वाचा
- वैद्यकीय सेवेसाठी कायम सहकार्य:-पालकमंत्री गुलाबराव पाटील; पालकमंत्र्यांचा डॉक्टर असोसिएशन मार्फत सत्कार
- अमळनेर येथे एमपीडीएतून सूटलेल्या,गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यावर अज्ञात व्यक्तिंनी लाठ्या काठ्यांनी केला जीवघेणा हल्ला.
- भडगांव महसुल विभागाची धडक कारवाई; अवैध वाळू चोरी करून वाहतुक करतांना २ डंपर जप्त
- आजचे राशी भविष्य बुधवार दि.५ फेब्रुवारी २०२५
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.४ फेब्रुवारी २०२५