जळगाव : जिल्हा उद्योग केंद्रातील अधिका-यांसोबत आपली चांगली ओळख असून तुम्हाला म्हशी खरेदीसाठी कर्ज मिळवून देते असे म्हणून तिस हजाराच्या ठरलेल्या लाचेपैकी दहा हजाराचा पहिला हप्ता घेणा-या खासगी महिलेस एसीबी पथकाने अटक केली आहे.विद्या परेश शहा असे या लाचखोर खासगी महिलेचे नाव आहे. तथापी या खासगी महिलेची लाच मागण्याची हिंमत नेमक्या कोणत्या अधिका-याच्या बळावर अथवा आशिर्वादाने झाली हे अद्याप उघड झालेले नाही.
या घटनेतील तक्रारदाराची जळगाव जिल्ह्याच्या रावेर तालुक्यातील मौजे पुरी या गावी वडीलोपार्जीत शेती आहे. तक्रारदारास या शेतजमीनीवर दुग्ध व्यवसाय करायचा होता. या व्यवसायासाठी म्हशी खरेदी करण्यासाठी त्याने काही दिवसांपुर्वी जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयात अर्ज दाखल केला होता. या ठिकाणी विद्या परेश शहा या खासगी महिलेसोबत त्याची ओळख झाली. मी तुमचे प्रकरण मंजूर करुन आणून देते. माझी येथील अधिका-यांशी ओळख आहे असे सांगून तिने तक्रारदारास तिस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
या लाचेच्या पहिल्या हप्त्याची दहा हजार रुपयांची रक्कम स्विकारतांना दबा धरुन बसलेल्या धुळे एसीबी पथकाने झडप घालून पुढील कारवाई केली. लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, कविता गांगुर्डे, संतोष पावरा, प्रविण मोरे, रामदास बारेला, प्रविण पाटील, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर या पथकाने केली आहे.
हे पण वाचा
- आजचे राशी भविष्य रविवार दि. ३० नोहेंबर २०२४
- दुर्दैवी घटना! घरात विवाह सोहळ्याची जय्यत तयारी, एकुलत्या एक मुलाच्या हळदीच्या दिवशीच आईने घेतला जगाचा निरोप.
- एस.टी. बसमधून प्रवास करणार्या महिला प्रवाशाच्या अडीच लाखांच्या दागिन्यांवर एस.टी.चालकाचा डल्ला, पोलिसी खाक्यानंतर दिली कबुली.
- धक्कादायक! प्रियकराशी बोलताना अडीच वर्षांची चिमुकली व्यत्यय अन् त्रास द्यायची म्हणून संतापलेल्या आईने निष्पाप लेकीला टेरेसवरुन फेकलं अन्……
- भीषण अपघात! दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात शिवशाही बस उलटली 11 जणांचा मृत्यू,20 हून अधिक प्रवासी जखमी; मृतांना तातडीने 10 लाख रुपयांची मदत.