यावल : सातपुड्याच्या वनराईत एक जण वणवा पेटवत असतांना वनविभागाला मिळून आला आहे. यावल तालुक्यातील पश्चिम भागात वाघझिरा वनक्षेत्रात वनविभागाने त्यास ताब्यात घेतले असुन त्याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल तालुक्यात पश्चिम भागात वाघझिरा गाव आहे या गावाच्या परिसरातील नियतक्षेत्र वाघझिरा वनखंड मधील कक्ष क्रमांक १४७ मध्ये वनविभागाचे कर्मचारी गस्तीवर होते तेथे त्यांना गजानन शालिग्राम लोहार हा वणवा लावतांना मिळून आला
तेव्हा वन विभागाने त्यास रंगेहात पकडले असुन त्यांच्या विरूध्द वाघझिरा वनपाल विपूल पाटील यांच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई यावलचे उपवनसंरक्षक जमीर शेख, सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे, वनक्षेत्र अधिकारी सुनील ताराचंद भिलावे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल विपुल पाटील, वनरक्षक हनुमंत सोनवणे, वनरक्षक ए. जी.राठोड तसेच संरक्षण मजूर,फायर वाचर यांनी केली आहे.