कत्तलीच्या उद्देशाने गोवंश वाहतूक करणाऱ्या वाहनास गोरक्षकांनी पकडुन केले पोलिसांच्या स्वाधीन एकावर गुन्हा दाखल.

Spread the love

यावल : तालुक्यातील दहिगाव या गावात दहिगावहून कोरपावली गावाकडे जाणारा रस्ता आहे. या रस्त्यावर शनिवारी रात्री एका वाहनात कत्तलीच्या उद्देशाने गोवंश वाहतूक केली जात होती. हा प्रकार गोरक्षकांच्या निदर्शनास आला त्यांनी तातडीने त्या ठिकाणी धाव घेतली व यावर पोलिसांना माहिती देण्यात आली तेव्हा सदर वाहन व गोवंश आणि चालक यांना यावल पोलीस ठाण्यात आणले याप्रकरणी रात्री उशिरा एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे व वाहन आणि गोवंश असा सुमारे एक लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

दहिगाव ता.यावल या गावातून कोरपावली कडे जाणारा रस्ता आहे. या दहिगाव – कोरपावली रस्त्यावर शनिवारी रात्री वाहन क्रमांक एम. एच.04 एच. एस .1987 मध्ये चालक हनीफ दगडू तडवी रा. महलखेडी हा कत्तलीच्या उद्देशाने गोवंश वाहतूक करीत होता. हा प्रकार दहिगाव गावातील गोरक्षकांच्या निदर्शनास आला. तेव्हा त्यांनी वाहन रोखले यावल पोलिसांना माहिती देण्यात आली.

घटनास्थळी पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाचपोळ, हवालदार राजेंद्र पवार हे पथकासह दाखल झाले आणि त्यांनी गोवंश वाहन व वाहन चालक याला ताब्यात घेतले रात्री उशिरा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात कत्तलीच्या उद्देशाने गोवंश वाहतूक केल्याप्रकरणी हनीफ तडवी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व त्यांच्याकडून गोवंश तसेच वाहन असा एक लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली यावल पोलीस करीत आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार