जळगाव :- राज्यात महिलांसह मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीय. अशातच जळगावात भाऊ बहिणीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आलीय.चार महिन्यांपासून काकाकडे राहत असलेल्या पुतण्याने आपल्या बहिणीवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला. याबाबत शनिपेठ पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध पोक्सोतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
शहरातील एका परिसरात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास त्यांच्यासोबत तिच्या काकांचा मुलगा देखील वास्तव्यास आहे. ही अल्पवयीन मुलगी इयत्ता आठवीच्या वर्गात शिकत आहे. मुलीचे कुटुंबिय घरी नसतांना मुलीचा चुलत भाऊ हा तिच्यावर अत्याचार करीत होता. गेल्या चार महिन्यांपासून तो मुलीवर अत्याचार करीत असल्याने मुलीला मारहाण देखील करीत असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे याप्रकरणी समुपदेशकांनी पोलीसात दिलेल्या तक्रारीवरुन शनिपेठ पोलिसात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रिया दातीर या करीत आहे.
हे पण वाचा
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती
- एरंडोल येथे तालुका व शहर काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न.
- होय एरंडोलच : अखेर ॲड. आकाश महाजन यांचा प्रयत्नांना यश.
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.