झुंजार प्रतिनिधी । एरंडोल
एरंडोल :- जोपर्यंत गरिबांचा कल्याण होणार नाही तोपर्यंत विकास शक्यच नाही शासकीय योजनांचा लाभ आदिवासी बांधव पर्यंत पोचवा असे आवाहन आमदार चिमणराव पाटील यांनी शासन आपल्यादारी या कार्यक्रमा प्रसंगीव्यक्त केले
उमर्दे येथील एकलव्य नगरात येथे आदिवासी टायगर सेना व अ भी ज ब संस्था यांच्या तर्फे आयोजित सामाजिक मेळाव्यात शासन आपल्यादारी महाराजस्व अभियान अंतर्गत कार्यक्रम आमदार चिमणराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी आदिवासी बांधवांना रेशन कार्ड जातीचे दाखले व इतर प्रमाणपत्र वितरण करण्यात आले यावेळी बोलताना आमदार चिमणराव पाटील म्हणाले उद्योगपतींचे नेहमी कामे होत असतात मात्र गरिबांची काम झाली पाहिजे गरिबांचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास शक्यच नाही तसेच शासकीय योजनांचा लाभ आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचला पाहिजे आदिवासी बांधव हे कोणत्याही योजनेपासून वंचित राहता कामा नये आणि यासाठी पदाधिकारी व प्रशासन यांचे नियोजन हे महत्वाचे आहे.
आदिवासींच्या समस्या सोडवणे हे आमचे कर्तव्य आहे तसेच ज्या कोणत्या गावाच्या समस्या असतील त्या समस्या सोडविण्यासाठी मी कटिबद्ध असून कोणीही न घाबरता थेट माझ्याशी संपर्क करावा व आपले काम करून घ्यावे असे आवाहन आदिवासी समाजाला केले त्याच प्रमाणे माझ्या हातून गरिबांचे काम होत असेल तर हे माझे भाग्यच आहे.
तालुक्यातील प्रांत अधिकारी व तहसीलदारयांच्यासह पंढरीनाथ मोरे यांच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले रेशन कार्ड पासून कोणीही वंशी जाता कामा नये तसेच शासकीय योजनांचा लाभ आदिवासी बांधवांच्या घरापर्यंत पोहोचवा असेही त्यांनी यावेळीअधिकाऱ्यांना सूचना दिल्या उमर्दे गावातील बेघरांना घरकुल मंजूर व्हावे यासाठी मागेही गायरानातजमिनी असताना त्याचा सतत पाठपुरावा करूनमोजणी फीस इतर रक्कमस्वतः वरूनया गावातीलबेघरांना तीस-चाळीस
घरकुल मंजूर करून दिलेराहिलेल्या लोकांनाहीलवकरच घरकुल योजनेचा लाभ मिळवून देऊअसे आश्वासन त्यांनी दिले
दरम्यान कार्यक्रमात आदिवासी टायगर सेनेचे राज्य प्रवक्ता पंढरीनाथ मोरे यांनी आदिवासींच्या समस्या वर लक्ष केंद्रित करून देताना आदिवासी समाजाच्या ठळक समस्या आमदार साहेबांच्या व प्रांत साहेबांच्या निदर्शनास आणून दिले असता प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी आदिवासी समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.कार्यक्रमासाठी जवळपासच्या गावातील उमर्दे ,धारागीर खडके ,सोनबर्डी ,कनाशी व भातखेडे, चोरटक्की येथील नागरिक उपस्थित होते.यावेळी जातीचे प्रमाणपत्र पत्र एकुण 75 रेशनकार्ड 80 चे वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमाप्रसंगी प्रांत अधिकारी विनय गोसावी तहसीलदार सुचिता चव्हाण माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर यांनीही मनोगत व्यक्त केले याप्रसंगी बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड युवा सेनेचे तालुका शहर प्रमुख अतुल महाजन पुरवठा निरीक्षक पुरवठा निरीक्षक नीळे वरिष्ठ लिपिक राजपूत सहाय्यक लिपिक यांनी सहकार्य केले
कार्यक्रमासाठी आदिवासी टायगर सेनेचे राज्य प्रवक्ता पंढरीनाथ मोरे जिल्हा उपाध्यक्ष सुनील मोरे एरंडोल तालुका अध्यक्ष संतोष सोनवणे उपाध्यक्ष संभाजी पवार तालुका सचिव उत्तम गायकवाड चोपडा तालुका अध्यक्ष आबा कांतीलाल बारेला प्रताप बारेला भास्कर दादा इतर
पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.