झुंजार प्रतिनिधी-संतोष कदम
वालचंदनगर ./-(ता. इंदापूर) 30 मार्च : निमसाखर येथील प्रगतशील शेतकरी, बागायतदार तसेच सुजित इंडस्ट्रीज चे मालक युवराज मोरे यांचा वाढदिवस नुकताच जंक्शन येथील ॲड. नितीन कदम यांच्या ऑफिस मध्ये केक कापून साधेपणाने वाढदिवस साजरा केला.
यावेळी कोरोना काळात आर्थिक संकटावर मात करण्यासाठी याच काळात भरपूर लोकांनी आपला रोजगार गमावला आहे .आणि या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी शेती पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय, पोल्ट्री फार्म, शेडनेट ची शेती, विविध प्रायोगिक पद्धतीचा अवलंब करून भरघोस असे उत्पन्न त्यांनी मिळवले आहे. शेतकऱ्यांना मोठी प्रेरणा दिली आहे. त्यांची पंचक्रोशी मध्ये प्रगतशील शेतकरी म्हणून ओळखले जातात असे गौरवोद्गार माजी शिवसेना तालुकाप्रमुख ॲड. नितीन कदम यांनी प्रगतशील शेतकरी युवराज मोरे यांच्याविषयी काढले. पुढे ते म्हणाले, युवावर्गाला शेती व्यवसायात मार्गदर्शन करणे हा त्यांचा छंद आहे. तसेच महिला बचत गट, महिलांना व्यवसाय प्रशिक्षणासाठी आग्रह धरणारा माणूस म्हणून त्यांची ओळख आहे.
यावेळी उपस्थित युवा शेतकरी वर्गाला मार्गदर्शन करताना प्रगतशील शेतकरी युवराज मोरे म्हणाले, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी मध्ये शेती कशी करता येईल याचा पुरे पूर्ण अभ्यास करून उद्योग या दृष्टिकोनातून शेतीकडे बघणे ही काळाची गरज आहे. आज आपण पूर्णपणे ओपन शेती करतो पण ओपन याच्यामधून बर्याचशा प्रमाणामध्ये निसर्ग आपल्यावर कोपलेला असतो. परंतु इंनहाऊस कंट्रोलिक सिस्टम ने जर शेती केली तर कुठल्याही शेतीला धोका होऊ शकत नाही. आणि आपण त्याच्यावर चांगल्या पद्धतीने उत्पन्न घेऊ शकतो. पारंपारिक शेती ही लहरी पाऊस आणि वातावरण यावर अवलंबून असते परंतु आधुनिक पद्धतीने शेती केल्यास त्यात हमखास उत्पन्नाची हमी आणि दर्जेदारपणा टिकवण्यासाठी नियोजन केल्यास योग्य मोबदला मिळतो. आधुनिक शेती केल्यास यात मोठी संधी असल्याचे मत प्रगतशील शेतकरी युवराज मोरे यांनी व्यक्त केले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते नागसेन मिसाळ, माजी शिवसेना तालुकाप्रमुख ॲड नितीन कदम, पत्रकार संतोष कदम, बापूराव बल्लाळ, अमुळ शिरसाट, संग्राम कदम, सुजित मोरे, विनोद सूर्यवंशी, आदी युवा शेतकरी उपस्थित होते.
शेती पाहण्यासाठी आणि माहिती घेण्यासाठी अनेक लोक त्यांच्या शेतीला भेट देत आहेत. त्यांच्याकडून प्रेरणा घेवून आर्थिक विमंचनेवर मात करण्यासाठी अनेकांनी ही शेती करण्याचा निर्धार केला आहे. अल्प गुंतवणुकीतून रोजगार मिळवणारा अल्पभूधारक शेतकरी इतरांना प्रेरणा देत आहे. नापिकीमुळे उत्पन्न कमी होणाऱ्या शेतीला पूरक व्यवसाय म्हणून कुकुट पालन, दुग्ध व्यवसाय केल्यास शेतकरी समृद्ध व्हायला वेळ लागणार नाही.