ViralVideo: दोन तरुणींनीचा चालू दुचाकीवर ‘रंग लगा दे’ गाण्यावर डान्स करून केली होळी साजरी, कारवाईची मागणी पहा व्हिडिओ.

Spread the love

Viral Video: आज देशभरात धुळीवंदनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. अशातचं आता सोशल मीडियावर दोन तरुणींचा होळीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्या चालू दुचाकीवर ‘रंग लगा दे’ गाण्यावर डान्स मूव्ह करताना दिसत आहेत. व्हिडिओ क्लिपमध्ये एक तरुण स्कूटी चालवताना दिसत आहे.

त्याच्यामागे बसलेल्या दोन तरुणी रंग लगा दे गाण्यावर डान्स मूव्ह करत एकमेकींना मिठी मारताना दिसत आहे. @Mohd_Aqib9 या वापरकर्त्याने हा व्हिडिओ शेअर केला असून त्याने व्हिडिओतील तरुण-तरुणींवर कारवाईची मागणी केली आहे. तसेच त्याने हा व्हिडिओला यूपी पोलिसांना टॅग केलं आहे. यावर यूपी पोलिसांनी रिट्विट करत कारवाई करण्यात येईल, असं आवाहन केलं आहे. या व्हिडिओवर नेटीझन्सकडूनही कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार