चित्रादुर्गा (कर्नाटक) :- येथील दर्शन बाबू या तरुणाला क्रिकेटच्या सामन्यांवर सट्टा लावण्याचे व्यसन होते. त्यासाठी तो कायम लोकांकडून पैसे उधारीवर घ्यायच्या. असे करत करत त्याच्या डोक्यावर तब्बल 1 कोटींचे कर्ज घेतले होते. त्यामुळे कर्ज दिलेल्या लोकांकडून सतत त्याच्या कुटुंबियांना त्रास दिला जायचा. या जाचाला कंटाळून दर्शन बाबू याची पत्नी रंजिता हिने गळफास घेत आत्महत्या केली आहे.दर्शन हा सिंचन विभागात इंजिनियर म्हणून काम करत होता.
त्याला आयपीएलच्या सामन्यांवर सट्टा लावायची सवय होती. 2021, 2022 आणि 2023 च्या आयपीएल सामन्यांवर त्याने कोट्यवधी रुपयांचा सट्टा लावला होता. त्यासाठी त्याने दीड कोटींहून अधिक रुपयांचे कर्जही घेतले होते. त्याने आतापर्यंत त्यातील 1 कोटी रुपये परत केले होते. मात्र अद्याप 84 लाख रुपये कर्ज बाकी होते.
रंजिता व दर्शनचे 2020 मध्ये लग्न झाले होते. मात्र रंजिताला त्याच्या या सट्ट्याच्या व्यसनाविषयी माहित नव्हते. मात्र लोकांनी पैशांसाठी त्रास द्यायला लागल्यावर तिने याबाबत तिच्या वडिलांना सांगितले होते. दर्शनने तब्बल 13 लोकांकडून पैसे घेतले होते व ते सर्व आपल्या पैशासाठी त्यांना त्रास देत होते.
हे पण वाचा
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती
- एरंडोल येथे तालुका व शहर काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न.
- होय एरंडोलच : अखेर ॲड. आकाश महाजन यांचा प्रयत्नांना यश.
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.






