Viral Video: देशभरात काल होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. दरम्यान, काही उपद्व्यापी लोकांनी होळीचा सणाला कलंक लावण्याचे काम केले.सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोन मुली आणि एका मुलासह तीन व्यक्ती स्कूटरवरून जात असल्याचे दिसत आहे.
मुलगा स्कूटर चालवत आहे तर मुली अश्लील चाळे करताना दिसत आहे.यावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केल्यानंतर आता नोएडा पोलिसांनी कारवाई केली आहे.व्हायरल व्हिडिओमध्ये दोन मुली ‘मोहे रंग लगा दे’ गाण्यावर स्कूटरवर बसून नाचताना दिसत आहेत. मुली नाचत नाचत, गाडीवर अश्लील कृत्ये करत आहेत. असे असले तरी सोशल मीडिया यूजर्स व्हिडिओ पाहिल्यानंतर संताप व्यक्त करत आहेत आणि कारवाईची मागणी करत होते.दरम्यान, नोएडा पोलिसांनी या व्हिडिओची दखल घेत घटनेचा तपास सुरू केला.
व आरोपींना शोधून काढले.X वरील पोस्टमध्ये, नोएडा वाहतूक पोलिसांनी “वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल संबंधित वाहनावर कारवाई करण्यात आली आहे. तसेच 33 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे,” असे म्हटले आहे.संबंधीत व्हिडिओ ग्रेटर नोएडा येथील होता. यामध्ये एक मुलगा दुचाकी चालवत आहे. तर मागे बसलेल्या दोन मुली रंग खेळत अश्लील चाळे करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला तीन जण हेल्मेटशिवाय दुचाकी चालवत आहेत.
हे पण वाचा
- वैद्यकीय सेवेसाठी कायम सहकार्य:-पालकमंत्री गुलाबराव पाटील; पालकमंत्र्यांचा डॉक्टर असोसिएशन मार्फत सत्कार
- अमळनेर येथे एमपीडीएतून सूटलेल्या,गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यावर अज्ञात व्यक्तिंनी लाठ्या काठ्यांनी केला जीवघेणा हल्ला.
- भडगांव महसुल विभागाची धडक कारवाई; अवैध वाळू चोरी करून वाहतुक करतांना २ डंपर जप्त
- आजचे राशी भविष्य बुधवार दि.५ फेब्रुवारी २०२५
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.४ फेब्रुवारी २०२५